आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सिगारेट पाकिटावरील इशारा; स्थगितीस सुप्रीम कोर्टाचा नकार

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली- सर्वोच्च न्यायालयाने सिगारेट व तंबाखूच्या पाकिटावरील ८५ टक्के भागावर सचित्र इशारा देण्याचा सरकारचा आदेश रद्द करण्याच्या कर्नाटक उच्च न्यायालयाच्या  अंतरिम आदेशावर स्थगिती देण्यास  नकार दिला आहे.  तथापि, सर्वोच्च न्यायालय या संबंधातील याचिकांवर ८ जानेवारी रोजी सुनावणी करणार आहे. 


सर्वोच्च न्यायालयाने आपला आदेश वेबसाइटवर अपलोड करण्याचे आदेश कर्नाटक उच्च न्यायालयास दिले आहेत. उच्च न्यायालयाच्या आदेशाविरोधात तंबाखूविरोधी कार्यकर्त्यांनी आणि हेल्थ फॉर मिलियन्स या स्वयंसेवी संस्थेने सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. कर्नाटक उच्च न्यायालयाने १५ डिसेंबर रोजी दिलेल्या आदेशात २०१४ चा  ८५ टक्के सचित्र वैधानिक इशारा छापण्याचा सरकारचा दुरुस्ती नियम रद्द केला होता.  जुन्या नियमानुसार ४० टक्के भागावर इशाऱ्याचे छायाचित्रे छापणे आवश्यक आहे, असे म्हटले होते. 

बातम्या आणखी आहेत...