Home | National | Delhi | News about impeachment of CJI in Parliament

CJI दीपक मिश्रा यांच्या विरोधात महाभियोग चालवण्याची तयारी, काँग्रेसने दिला नकार

दिव्य मराठी वेब टीम | Update - Mar 28, 2018, 10:55 AM IST

गुलाम नबी आझाद म्हणाले की, काँग्रेसने CJI च्या विरोधात महाभियोग चालवण्याबाबत अद्याप काहीही भूमिका घेतलेली नाही.

 • News about impeachment of CJI in Parliament
  राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते माजीद मेनन यांनी दावा केला की, काँग्रेसने यावर सही केली असून राष्ट्रवादी काँग्रसही त्याचे समर्थन करणार आहे. - फाइल

  नवी दिल्ली - विरोधी पक्ष सुप्रीम कोर्टाचे सरन्यायाधीश जस्टिस दीपक मिश्रा यांच्या विरोधात संसदेमध्ये महाभियोग प्रस्ताव आण्याच्या तयारीत आहेत. सरन्यायाधीशांच्या कामाच्या पद्धतीवर प्रश्नचिन्हं उपस्थित करत जानेवारी महिन्यात सुप्रीम कोर्टाच्या 4 सीनियर जजने पत्रकार परिषद घेतली होती. मीडिया रिपोर्ट्सनुसार काँग्रेसने महाभियोग प्रस्तावाचा ड्राफ्ट विरोधी पक्षांना वाटला आहे.


  राष्ट्रवादीच्या नेत्याचा दावा..
  - राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते माजीद मेनन यांनी दावा केला की, काँग्रेसने यावर सही केली असून राष्ट्रवादी काँग्रसही त्याचे समर्थन करणार आहे.
  - एनसीपीचेच डीपी त्रिपाठी म्हणाले की, महाभियोग प्रस्तावाच्या ड्राफ्टवर NCP, लेफ्ट आणि माझ्या माहितीनुसार टीएमसी आणि काँग्रेसनेही सह्या केल्या आहेत.


  काँग्रेसचा नकार
  राज्यसभेतील काँग्रेस नेते गुलाम नबी आझाद म्हणाले की, आतापर्यंत तरी काँग्रेसने CJI च्या विरोधात महाभियोग चालवण्याबाबत काहीही भूमिका घेतलेली नाही.

 • News about impeachment of CJI in Parliament

  गुलाम नबी आझाद म्हणाले की, काँग्रेसने CJI च्या विरोधात महाभियोग चालवण्याबाबत अद्याप काहीही भूमिका घेतलेली नाही. 

   

Trending