आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पाक राजनयिकाचे नाव प्रथमच एनआयएच्या वाँटेड लिस्टमध्ये, दहशतवादी हल्ल्याच्या षडयंत्राचा आरोप

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - राष्ट्रीय तपास संस्थेने (एनआयए) पाकिस्तानचे माजी राजनयिक आमिर जुबैर सिद्दिकी यांच्यासह 3 अधिकाऱ्यांची नावे वाँटेड लिस्टमध्ये टाकली आहेत. आमिर सिद्दिकी हे श्रीलंकेत पाकिस्तान हाय कमिशनमध्ये व्हिसा काऊन्सलर होते. एनआयएच्या एका अधिकाऱ्याने सोमवारी सांगितले, की ही पहिलीच वेळ आहे, जेव्हा पाकिस्तानच्या राजनयिकाचे नाव वाँटेड लिस्टमध्ये आले आहे. त्यांच्यावर दक्षिण भारतात आर्मी आणि नौदलाच्या कमांड्सवर हल्लाचे षडयंत्र रचल्याचाही आरोप आहे. असेही म्हटले जात आहे, की अमेरिकेवर झालेल्या 26/11 आणि इस्त्रायल दुतावासावर झालेल्या दहशतवादी हल्ल्यातही यांचा समावेश होता. 

 

रेड कॉर्नर नोटीसची मागणी 
- पाकिस्तानने आपल्या राजनयिकाला कोलंबोमधून परत बोलावून घेतले आहे. एनआयएने जुबैरविरोधात फेब्रुवारीमध्ये चार्जशीट दाखल केली होती. आमिर जुबैर सुद्दिकीसह आणखी दोन नावे तपास यंत्रणेकडे आहेत. हे दोघे पाकिस्तान गुप्तचर संस्थेतील असून त्यांनी त्यांची नावे बॉस उर्फ शाह आणि विनीत ठेवले होते. 
- दुसरीकडे, एएनआयने इंटरपोलला त्यांच्याविरोधात रेड कॉर्नर नोटीस जारी करण्याची अपील केली आहे.

बातम्या आणखी आहेत...