आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नीरव मोदीकडे 6 पासपोर्ट, गुन्हा दाखल; बेल्जीयम मध्ये दिसल्याची माहिती

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - पंजाब नॅशनल बँकेचे १३,५०० कोटी रुपये बुडवून फरार झालेला हिरे व्यावसायिक नीरव मोदीविरुद्ध अनेक पासपोर्ट बाळगल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याच्याकडे सहा पासपोर्ट असल्याची माहिती तपास संस्थांना मिळाली आहे. त्यापैकी दाेन पासपोर्ट काही दिवसांआधीपर्यंत वैध होते. 


इतर चार पासपोर्ट मुदतबाह्य झाले होते. एका सक्रिय पासपोर्टवर त्याचे पूर्ण नाव नीरव मोदी तर दुसऱ्यावर फक्त नीरव होते. या पासपोर्टवर त्याला ४० महिन्यांचा ब्रिटनचा व्हिसा मिळालेला होता.  तपास संस्थांनी सांगितले की, नीरव मोदी नुकताच बेल्जियममध्ये दिसला होता. तो या पासपोर्टवरून परदेश दौरे करत होता. तथापि, भारताने त्याचे २ पासपोर्ट आधीच रद्द केलेले असून त्याची माहिती इंटरपाेललाही दिली होती. रद्द पासपोर्टचा वापर केल्याप्रकरणी त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सीबीआय आणि ईडीने नुकतेच इंटरपोलला नीरवविरुद्ध रेड कॉर्नर नोटीस काढण्याचे आवाहन केले आहे.

 

बातम्या आणखी आहेत...