आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नीरव मोदीच्या वकीलाचा दावा: 2जी, बोफोर्स प्रमाणे हे प्रकरणही थंड बस्त्यात जाणार, तपास यंत्रणांचा नुसता गोंधळ

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नीरव मोदीने बँकेला पत्र लिहून आता मी कर्ज परतफेड करणार नाही असे म्हटले आहे. - Divya Marathi
नीरव मोदीने बँकेला पत्र लिहून आता मी कर्ज परतफेड करणार नाही असे म्हटले आहे.

नवी दिल्ली - पीएनबी फ्रॉड केसमधील हिरे व्यापारी नीरव मोदीचे वकील विजय अग्रवाल यांनी दावा केला आहे की 2जी आणि बोफोर्स घोटाळ्याप्रमाणे ही केसही बंद होईल. तपास यंत्रणा या माध्यमांसमोर गोंधळ घालत आहेत. अनेक दावे करत आहेत, मात्र कोर्टामध्ये आरोप सिद्ध करण्यासाठी त्यांच्याकडे एकही ठोस पुरावा नाही. आम्हाला विश्वास आहे की नीरव मोदी निर्दोष मुक्त होईल. नीरव मोदीवर आरोप आहे की त्याने पंजाब नॅशनल बँकेच्या अधिकाऱ्यांना हाताशी धरून बनावट लेटर ऑफ अंडरटेकिंग (LoU) तयार करुन विदेशी अकाऊंटमधून 11,400 कोटींचे कर्ज घेतले.

 

नीरव मोदी आणि पीएनबी फ्रॉड केसमधील Update 
- पंजाब नॅशनल बँकेला 11,400 कोटी रुपयांचा चूना लावून विदेशात फरार झालेल्या नीरव मोदीने 13 फेब्रुवारीला एक पत्र लिहिले आहे. त्यात त्याने बँकेवरच आरोप केले आहेत. नीरवने पत्रात म्हटले आहे, 'कर्ज प्रकरणाची जाहीर वाच्यता करुन पीएनबीने कर्ज परतफेडीचे सर्व मार्ग बंद केले आहेत. बँकेने केलेल्या अतिघाईमुळे माझा ब्रँड आणि व्यवसाय बुडाला आहे.'
- या पत्रात नीरवने म्हटले आहे, की बँकांची देणी 5 हजार कोटींपेक्षा कमी आहे. माझ्या कंपनीच्या खात्यातील रकमेतून 2,200 कर्मचाऱ्यांचा पगार करण्याची परवानगी द्यावी. (येथे क्लिक करुन वाचा संपूर्ण वृत्त)

 

2- पीएनबीच्या 3 व्यवस्थापकांना अटक 
- सीबीआयने सोमवारी उशिरा पीएनबीच्या आणखी 3 व्यवस्थापकांना अटक केली आहे. यामध्ये फॉरेक्स डिपार्टमेंटचे तत्कालिन चीफ मॅनेजर बच्चू तिवारी, फॉरेक्स डिपार्टमेंटचे स्केल-2 मॅनेजर यशवंत जोशी आणि एक्सपर्ट सेक्शनमध्ये तैनात स्केल-1 अधिकारी प्रफुल्ल सावंत यांना अटक झाली आहे. 
- पीएनबी फ्रॉड प्रकरणी आतापर्यंत 6 जणांना अटक झाली आहे. 

बातम्या आणखी आहेत...