आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

PNB महाघोटाळा: गुजरातमध्ये पापड विकत होते नीरव मोदीचे कुटुंब, आता 10 देशात हिऱ्यांचा व्यापार

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नीरवचे वडील बेल्जियमला स्थायिक झाले होते. - Divya Marathi
नीरवचे वडील बेल्जियमला स्थायिक झाले होते.

नवी दिल्ली - बँकिंग क्षेत्रातील महाघोटाळा करणारा हिरे व्यापारी नीरव मोदीचे आजी-आजोबा कधीकाळी गुजरातमध्ये पापड विकण्याचा व्यवसाय करत होते. आज या कुटुंबाचा हिरे व्यापार 10 देशांमध्ये पसरलेला आहे. नीरवची एकूण संपत्ती 11,500 कोटी रुपयांपर्यंत आहे. नीरव मोदीने पंजाब नॅशनल बँकेची 11,400 कोटींची फसवणूक केली आहे. यानंतर मोदी फॅमिली देशसोडून पसार झाली आहे. सूत्रांची माहिती आहे की नीरव मोदी बेल्जियमध्ये आपल्या भावाकडे गेला आहे. अंमलबजावणी संचलनालयाने (ईडी) 14 फेब्रुवारी रोजी नीरव मोदी आणि त्याच्या कुटुंबियाविरोधात मनी लाँड्रिंगची केस दाखल केली. त्यानंतर गुरुवारी देशभरातील 17 ठिकाणांवर छापेमारी करण्यात आली. 

 

पूर्वी पापड विकत होते कुटुंब
- नीरव गुजरातमधील पालनपूरचा आहे. वडील पीयूष कुटुंबासह बेल्जियममध्ये स्थायिक झाले होते. नीरवचा जन्मही बेल्जियमध्ये झाला. पालनपूरमध्ये नीरवचे आजोबा किरायाने राहतात आणि आजी पापड विकत होती.

- त्याचा व्यापार अमेरिका, इंग्लंड, फ्रान्स, मकाऊ, हाँगकाँग, बेल्जियम, यूएई, रशिया आणि सिंगापूरमध्ये आहे. 

 

फायरस्टार इंटरनॅशनल आहे पॅरेंट कंपनी 
- या कंपनीची सुरुवात 1 एप्रिल 2004 मध्ये झाली होती. यामध्ये मोदी कुटुंबाची 90.17% भागीदारी आहे. 2016-17 मध्ये कंपनीचे टर्नओव्हर 14.706 कोटी आणि नफा 582 कोटी होता. व्हॅल्यूएशन 9,088 कोटी रुपये आहे. 
- यूएईची फायरस्टार डायमंड एफझेडई ही कंपनी मोदी समुहाची सर्वात मोठी सब्सियरी कंपनी आहे. 2015-16 मध्ये या कंपनीचा रेव्हेन्यू 3,100 कोटी रुपये होता. तर नफा 216 कोटी रुपये होता. 

 

नीरव  मोदीच्या 17 ठिकाणांवर छापे 

व्यावसायिक नीरव मोदी याच्याविरुद्ध कारवाई करत ईडीने गुरुवारी 5100 कोटी रुपयांचे हिरे, दागिने आणि सोने जप्त केले. मुंबईत 6 मालमत्ताही सील केल्या. मुंबई, दिल्ली, हैदराबाद, जयपूर आणि सुरतमध्ये नीरवशी संबंधित 17 ठिकाणांवर छापे टाकण्यात आले. सीबीआयनेही 20 ठिकाणे छापे टाकले. नीरवच्या कंपन्यांना भारतीय बँकांच्या हाँगकाँग शाखांतून पैसे दिले गेले. त्यामुळे तेथेही तक्रार दाखल करण्यात आली.


किमान 30 बँकांनी पीएनबीच्या एलओयूवर (लेटर ऑफ अंडरटेकिंग) नीरवच्या कंपन्यांना कर्ज दिले. पीएनबीने सीबीआयला 150 बनावट एलओयूच्या प्रती दिल्या आहेत. दरम्यान, काँग्रेसने नीरवचे दावोसमधील पंतप्रधानांसोबतचे छायाचित्र जाहीर करून त्याला छोटा मोदी संबोधले. यावर भाजपचे रविशंकर प्रसाद म्हणाले, असे काँग्रेस नेत्यांचेेही फोटो आहेत.

 

ईडीने कुठे टाकले छापे?
- ईडीने नीरव मोदीच्या 17 ठिकाण्यांवर छापे टाकले आहेत. 
- मुंबईतील कुर्ला येथील घर, काळाघोडा येथील ज्वेलरी शोरुम, वांद्रे येथील 3 ठिकाणी ईडीने छापेमारी केली आहे. 
- सूरतमध्ये तीन ठिकाणी कारवाई करण्यात आली. 
- दिल्ली येथे चाणक्यपूरी आणि डिफेन्स कॉलनी येथील शोरुमवर ईडीने छापा टाकला आहे.

 

इकडे लूकआऊट नोटीस जारी... अन् जानेवारीच्या सुरुवातीलाच नीरव मोदीने भारत सोडला होता

नीरव मोदी, त्याची पत्नी एमी, भाऊ विशाल आणि व्यवसायातील भागीदार व मामा मेहुल चौकसी यांच्याविरुद्ध 31 जानेवारीला सीबीआयने गुन्हा दाखल केला. ही तक्रार 29 जानेवारीला आली होती. मात्र, नीरव भावासोबत 1 जानेवारीलाच भारताबाहेर पळाला होता. भाऊ विशालकडे बेल्जियम तर पत्नी एमीकडे अमेरिकेचे नागरिकत्व आहे. एमी आणि गीतांजली जेम्सचा प्रमोटर मेहुल 6 जानेवारीला भारतातून पळाले. सीबीआयने या चौघांविरुद्ध 4 फेब्रुवारीला लूकआऊट नोटीस बजावली.

 

पुढील स्लाइडमध्ये वाचा, कुठला आहे नीरव मोदी... 

बातम्या आणखी आहेत...