आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

निर्भया गँगरेप: जो अल्पवयीन आरोपी फक्त 3 वर्षांची कैद भोगून सुटला, त्यानेच केले होते सर्वात पाशवी कृत्य

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - दिल्लीतील निर्भया सामूहिक बलात्कार प्रकरणातील दोषींना दिलेली फाशीची शिक्षा सुप्रीम कोर्टाने कायम ठेवली आहे. सुप्रीम कोर्टात सोमवारी दोषींच्या फाशीच्या शिक्षेवरील पुनर्विचार याचिकेवर सुनावणी झाली. सुप्रीम कोर्टाने ही याचिका फेटाळून लावली.

 

> एकूण 6 आरोपींपैकी एकाने तुरुंगातच आत्महत्या केली होती, चौघांना फाशी शिक्षा झाली आहे, परंतु एक पाचवा आरोपीही होता, जो फक्त 3 वर्षांची शिक्षा भोगून सुटला होता. तो सुटला तेव्हा देशभरात संतापाची लाट उसळली होती. 

अल्पवयीन आरोपीचे वय तेव्हा 17 वर्षे 6 महिने होते. 16 डिसेंबर 2012 रोजी दिल्लीच्या वसंत विहारमध्ये निर्भयासोबत ज्याने सर्वात जास्त पाशवी कृत्य केले, तो सर्वात कमी शिक्षा होऊन सुटला होता.


यानेच केला निर्भयासोबत सर्वात जास्त पाशवीपणा
20 डिसेंबर 2015 रोजी जो अल्पवयीन आरोपी शिक्षा भोगून सुटला, त्याने 16 डिसेंबर 2012 च्या रात्री निर्भयावर सर्वात जास्त अत्याचार केले होते. निर्भयाच्या मृत्यूसाठी तोच सर्वात जास्त जबाबदार आहे. पोलिस चौकशीत समोर आले आहे की, या सहाव्या अल्पवयीन आरोपीने पीडितेला हाक मारून बसमध्ये बोलावले होते. एवढेच नाही, बसमध्ये बसल्यानंतर या सर्वात कमी वयाच्या आरोपीनेच इतर 5 जणांना गँगरेपसाठी उचकवले आणि तोच पूर्ण घटनाक्रमाचा सूत्रधारही बनला.

 

डॉक्टरांना कापावे लागले होते आतडे...

> पोलिस चौकशीत समोर आले आहे की, त्या अल्पवयीन मुलाने गँगरेप दरम्यान पीडित निर्भयावर भयंकर अत्याचार केले. त्यानेच दोन वेळा पाशवी बलात्कार केला होता. त्याच्या जनावरांनाही लाजवणाऱ्या कृत्यामुळे निर्भयाचे आतडेही बाहेर आले होते. 
> दुष्कर्मादरम्यान पीडिता बहादुरीने त्या सर्वांना विरोध करत होती, त्यांना लाथा घालत होती, दातांनी चावे घेत होती, परंतु तिला कल्पना नव्हती की, गंजलेल्या लोखंडी रॉडचा वापर तिच्यावर भयानक अत्याचार करण्यासाठी केला जाईल.
> निर्भयाच्या आतड्यांना दुखापत झाल्यामुळे तिच्यावर अनेक वेळा ऑपरेशन करावे लागले होते. शेवटी डॉक्टरांना तिचे आतडेच कापून बाहेर काढावे लागले होते. पूर्ण शरीरात इन्फेक्शन पसरले, तिला सिंगापूरला उपचारांसाठी नेण्यात आले. परंतु स्वत:ला अल्पवयीन म्हणवणाऱ्या त्या नराधमाने डॉक्टरांचे प्रयत्न फेल ठरले. शेवटी वेदनांशी झुंजतच निर्भयाने जगाचा निरोप घेतला होता.

 

 

 

बातम्या आणखी आहेत...