आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आर्थिक विकासदर दोन अंकी करण्याचे आव्हान, निती आयोग बैठकीत म्हणाले मोदी

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

- मोदींच्या अध्यक्षतेखाली निती आयोगाच्या गव्हर्निंग काऊंसिलची चौथी बैठक झाली. राज्यांचे मुख्यमंत्रीही त्यात सहभागी झाले होते. 

- बैठकीत मोदींनी सरकारच्या योजना आणि आर्थिकदर वाढवण्याबाबत चर्चा केली. 


नवी दिल्ली - येथे रविवारी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या अध्यक्षतेत निती आयोगाच्या गव्हर्निंग काऊंसिलची चौथी बैठक झाली.  त्यात मोदी म्हणाले, आयोग ऐतिहासिक बदल करू शकतो. 2017 च्या चौथ्या तिमाहीमध्ये आर्थिक विकासदर 7.7% राहिला आहे. सरकारसमोर सर्वात मोठे आव्हान हा आकडा दोन अंकी होईपर्यंत वाढवणे हा आहे. त्यासाठी अनेक महत्त्वाची पावले उचलली जाणार आहेत. 


मोदींनी पूरप्रभावित राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना केंद्राकडून शक्य ती मदत देण्याचे आश्वासन दिले. निती आयोगाच्या बैठकीत शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करणे, जिल्ह्यांचा विकास, आयुष्यमान भारत योजना, मिशन इंद्रधनुष, पोषाहार आणि महात्मा गांधींच्या 150व्या जयंती समारोहानिमित्त चर्चा झाली होती. 


राज्यांना सुचवला फॉर्म्युला 
- मोदी म्हणाले की, मुख्यमंत्री स्वच्छ भारत मिशन, डिजिटल ट्रान्झॅक्शन आणि स्किल डेव्हलपमेंट सारख्या मुद्द्यांवर उपसमित्या तयार करून महत्त्वाची भूमिका निभावू शकतात. या उपसमित्यांच्या सिफारशी केंद्राच्या अनेक मंत्रालयांनी लागू केल्या आहेत. 
- मोदी म्हणाले की, सरकारच्या योजनांचा उद्देश 2020 मध्ये व्हिजन न्यू इंडियाची स्वप्नपूर्ती हा आहे. निती आयोगाची गव्हर्निंग काऊंसिल देशाच्या विकासात महत्त्वाचे योगदान देऊ शकते. 


केजरीवालांच्या ट्वीटने वाढला वाद 
- अरविंद केजरीवाल यांनी ट्वीट केले, संविधानाच्या कोणत्या कलमानुसार दिल्लीचे उपराज्यपाल मुख्यमंत्र्यांच्या अधिकारांत बदल करत आहेत? मी त्यांना माझ्या ऐवजी कुठेही जाण्याचा अधिकार दिलेला नाही. 
- त्यावर निती आयोगाचे सीईओ अमिताभ कांत यांनी त्यांना उत्तर दिले. तुम्ही चुकीचे आहात. गव्हर्निंग काऊंसिलच्या बैठकीत दिल्लीचे उपराज्यपाल उपस्थित नव्हते. 
- दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल राजभवनात त्यांच्या तीन मंत्र्यांसह 7 दिवसांपासून धरणे देत आहेत. 


 

बातम्या आणखी आहेत...