आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

स्विस बँकांमध्ये जमा असलेल्या भारतीयांच्या 300 कोटी रुपयांना तीन वर्षांनंतरही मिळेना दावेदार

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

- स्विस नॅशनल बँकेने 2015 मध्ये 3,500 निष्क्रिय खात्यांची यादी जाहीर केली होती. 

- स्विस बँकांमध्ये जमा असलेल्या विदेशी धनामध्ये 0.07% भागीदारी भारतीयांची आहे. 
 

ज्यूरिख/नवी दिल्ली - स्विस नॅशनल बैंक (एसएनबी) ने सलग तिसऱ्या वर्षी दावेदार नसलेल्या खात्यांची यादी जाहीर केली आहे. यात 6 भारतीय खात्यांचाही उल्लेख आहे. एसएनबीने डिसेंबर 2015 मध्ये प्रथमच 3,500 हून अधिक निष्क्रीय खात्यांची यादी जाहीर केली होती. ही दरवर्षी अपडेट केली जाते आणि ज्यांचे दावेदार समोर येतात त्यांची नावे या यादीतून काढली जातात. 2017 मध्ये या यादीतीस 40 खाते आणि दोन सेफ डिपॉझिटची माहिती हटवली आहे. 


तीन वर्षांनंतरही भारतीयांच्या 6 खात्यांचे दावेदार समोर आलेले नाहीत. एसएनबीनुसार या बँकांमध्ये सुमारे 4.4 कोटी स्विस फ्रँक म्हणजे 300 कोटी रुपये जमा आहेत. या लोकांची नावेही जाहीर करण्यात आळी आहेत. यात मुंबईचे  पियरे वाचेक आणि बेर्नेट रोसमेरी, डेहरादूनचे बहादूर चंद्र सिंह यांचा समावेश आहे. त्याशिवाय मोहल लाल पेरिस आणि सुच्चा योगेश प्रभु दास लंडनमध्ये राहत आहेत. आणखी एक भारतीय खातेधारक किशोर लाल आहेत. त्यांच्याबाबत काहीही माहिती मिळालेली नाही. ही खाती 2020 पर्यंत ठेवली जातील. नंतर ती बंद केली जातील. 


भारतीयांचे 7000 कोटी जमा 
एसएनबीच्या माहितीनुसार स्विस बँकेमध्ये 2017 मधील भारतीयांचा जमा असलेली रक्कम 50 टक्क्यांनी वाढून 1.01 अब्ड सीएचएफ (स्विस फ्रँक) म्हणजे सुमारे 7,000 कोटींवर पोहोचला आहे. एसएनबीने हेही सांगितले की, स्विस बँकांमध्ये जमा असलेल्या विदेशी पैशात भारतीयांची भागीदारी 0.07% आहे. स्वित्झरलंडने भारतासह काही देशांना माहिती देण्यासाठी प्रक्रियाही तयार केली आहे. पुढच्या वर्षापासून भारताला अॅटोमॅटिक डाटा मिळण्यास सुरुवात होईल. 

बातम्या आणखी आहेत...