Home | National | Delhi | No Governor Can Go Against Constitution Says Congress

2 दिवसांत बहुमत सिद्ध करणार, येदियुरप्पांचा दावा; सिद्धारमैया म्हणाले- सर्व 118 आमदार आमच्यासोबत

दिव्य मराठी वेब टीम | Update - May 17, 2018, 04:10 PM IST

कर्नाटकचे राज्यपाल वजूभाई वाला संविधानाच्या विरोधात जाऊ शकत नसल्याचे काँग्रेसने म्हटले आहे.

 • No Governor Can Go Against Constitution Says Congress

  बंगळुरू - सुप्रीम कोर्टात मध्यरात्री झालेल्या सुनावणीनंतर न्यायालयाने राज्यपालांचा निर्णयाला स्थगिती देण्यास नकार दिला. येदियुरप्पा यांनी सकाळी ठीक 9 वाजता कर्नाटकच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. राजभवनात हा समारंभ पार पडला. अशा प्रकारे येदियुरप्पा कर्नाटकचे तिसऱ्यांदा मुख्यमंत्री बनले आहेत. आणि भाजपने 21वे राज्य ताब्यात घेतले आहे. आता बहुमत सिद्ध करण्यासाठी 15 दिवसांचा अवधी भाजपला मिळालेला असून या काळात त्यांना बहुमत सिद्ध करावे लागणार आहे. दरम्यान, शपथविधी झाल्यानंतर येदियुरप्पा म्हणाले, दोन दिवसांमध्ये आम्ही बहुमत सिद्ध करु. दुसरीकडे, राज्यपालांच्या निर्णयाविरोधात धरणे आंदोलन करणाऱ्या सिद्धारमैया यांनी दावा केला आहे, की जेडीएस-काँग्रेस यांच्यासह दोन अपक्ष असे 118 आमदार आमच्यासोबत आहेत. तथापि, सुप्रीम कोर्टाने 18 मे रोजी या वादांसंबंधी पुढील सुनावणी ठेवली असून भाजपला समर्थन असलेल्या आमदारांची नावे मागितली आहेत.

  वेगवान नाट्यमय घडामोडी

  कर्नाटकात सत्तास्थापनेसाठी राज्यपाल वजुभाई वाला यांनी बुधवारी रात्री भाजपला निमंत्रित केले. यानुसार भाजप नेते येदियुरप्पा गुरुवारी सकाळी नऊ वाजता मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार आहेत. येदियुरप्पा यांना बहुमत सिद्ध करण्यासाठी राज्यपालांनी १५ दिवसांची मुदत दिली असली तरी येदियुरप्पा २१ मे रोजी बहुमत सिद्ध करतील. शपथविधी सोहळ्यास पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजप अध्यक्ष अमित शहा उपस्थित राहणार नसल्याचे सूत्रांनी सांगितले.

  काँग्रेसने बुधवारी रात्री दाखल केली याचिका, रात्री 2.10 वाजता सुनावणीस सुरुवात

  भाजपला सत्ता स्थापनेसाठी निमंत्रित करण्याच्या निर्णयाला काँग्रेसने बुधवारी रात्री सुप्रीम कोर्टात आव्हान दिले. हा प्रकार लोकशाहीची हत्या असल्याचे नमूद करत सरन्यायाधीशांनी तातडीने यात हस्तक्षेप करावा, अशी विनंती काँग्रेसने केली. सुप्रीम कोर्टाच्या रजिस्ट्रारची भेट घेऊन काँग्रेस नेते अभिषेक सिंघवी यांनी ही याचिका तातडीच्या सुनावणीसाठी घ्यावी, अशी विनंती केली.


  त्‍यानंतर सरन्‍यायाधीश दीपक मिश्रा यांच्‍या अध्‍यक्षतेखालील 3 न्‍यायाधीशांच्‍या बेंचने रात्री 2.10 वाजता काँग्रेसच्‍या याचिकेवर सुनावणी सुरू केली. सुप्रीम कोर्टाने दोन्‍ही बाजूंचे म्‍हणणे ऐकून घेतल्‍यानंतर येदियुरप्‍पांना शपथ घेण्‍यापासून रोखण्‍यास नकार दिला. 'या अर्जावर नंतरही सुनावणी करता येईल', असे सांगत या प्रकरणाची सुनावणी उद्यापर्यंत तहकूब करत असल्‍याचे सुप्रीम कोर्टाने म्‍हटले आहे. येदियुरप्‍पांसहित संबंधित लोकांना याचिकेवर उत्‍तर देण्‍याचे आदेशही कोर्टाने दिले आहेत.

  राज्‍यपालांनी निमंत्रित केले, मात्र बहुमत कसे सिद्ध करणार भाजप

  कर्नाटकात सत्ता मिळवण्यासाठी बुधवारी दिवसभर राजभवनात आणि बाहेर विविध पक्षांच्या नेत्यांची वर्दळ होती. मात्र, राज्यात नेमकी कुणाची सत्ता येणार याबद्दलचे गूढ रात्री उशिरापर्यंत कायम होते. दरम्यान, भाजप आणि काँग्रेस-जेडीएस या दोन्ही पक्षांनी बहुमताचा दावा केला. रात्री उशिरा राज्यपालांनी भाजपला निमंत्रित केले. आता खरी उत्सुकता आहे ती भाजप बहुमत सिद्ध कसे करणार याची. यासाठी काँग्रेस व जेडीएसचे किती आमदार मदतीला येतील, हे महत्त्वाचे ठरेल.

  एकट्या येड्डींनाच देणार शपथ
  दरम्यान, गुरुवारी भाजपचे मुख्यमंत्रिपदाचे प्रमुख दावेदार असलेले नेते येदियुरप्पा यांनाच पद व गोपनीयतेची शपथ दिली जाणार आहे. इतर कोणत्याही मंत्र्यांना शपथ दिली जाईल.


  गणित असे : २२२ सदस्यांच्या विधानसभेत बहुमतासाठी ११२ सदस्यांची गरज. भाजपकडे १०४ सदस्य. काँग्रेस व जेडीएसचे मिळून १३ आमदार गैरहजर राहिले तर बहुमताचा आकडा होईल १०४.

  इंग्लंटन रिसॉर्टमध्ये १२० आलिशान खोल्या बुक
  राज्यपालांसमोर आमदारांची परेड झाल्यानंतर काँग्रेस व जेडीएसने आपले आमदार दूर रिसॉर्ट आणि हॉटेलात पाठवले असल्याचीही चर्चा होती. भाजप नेते या आमदारांशी संपर्क साधू शकणार नाहीत अशी संपूर्ण दक्षता घेतली जात होती. सूत्रांनुसार, काँग्रेसने इग्लटन रिसॉर्टमध्ये या सर्व आमदारांना ठेवण्यासाठी तब्बल १२० खोल्या बुक केल्या होत्या. तर, जेडीएसचे आमदार हॉटेल शांग्रिलामध्ये प्रवेश करत असल्याचे काही जणांनी पाहिले होते, अशी माहिती समोर येत आहे.

  काँग्रेसचे १२, जेडीएसचे २ आमदार गायब; पाठिंब्याच्या पत्रावर स्वाक्षऱ्या
  दरम्यान, बुधवारी भाजप, जेडीएस आणि काँग्रेसने आपापल्या आमदारांची बैठक बोलावली होती. या बैठकीला जेडीएसचे राजा वेंटप्पा नायक, वेंकटराव नडगौडा उपस्थिती नव्हते. काँग्रेसचे ७८ पैकी ६६ आमदाराच बैठकीला उपस्थित होते. काही भागातून आमदारांना बैठकीत आणण्यासाठी काँग्रेसने हेलिकॉप्टरही पाठवले होते.

  पुढील स्‍लाइडवर वाचा, मोदी राजमध्ये राज्यपाल केवळ भाजपाला सरकार स्थापण्याचे निमंत्रण देण्याची प्रथा...

 • No Governor Can Go Against Constitution Says Congress
 • No Governor Can Go Against Constitution Says Congress
 • No Governor Can Go Against Constitution Says Congress
  काँग्रेस आणि जेडीएसचे आमदार सरकार स्थापनेचा दावा करण्यासाठी बसने राजभवनात पोहोचले.
 • No Governor Can Go Against Constitution Says Congress
 • No Governor Can Go Against Constitution Says Congress
 • No Governor Can Go Against Constitution Says Congress

Trending