आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महाभियोगाच्या नोटिसवर मनमोहन यांची सही नाही, खुर्शीद यांनीही केला विरोध

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - सुप्रीम कोर्टाचे सरन्यायाधीश दीपक मिश्रा यांच्या विरोधात काँग्रेससह 7 विरोधी पक्षांनी महाभियोगाची नोटिस दिली आहे. उपराष्ट्रपती आणि राज्यसभेचे सभापती व्यंकय्या नायडू यांच्याकडे ही नोटिस सुपूर्त करण्यात आली आहे. मात्र या प्रस्तावावर माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी सही केलेली नाही. तसेच काँग्रेस नेते सलमान खुर्शीद यांनीही या प्रकरणी काँग्रेस विरोधी भूमिका घेतली आहे. 


यामुळे नाही मनमोहन यांची सही 
माजी पंतप्रधान आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मनमोहन सिंग यांची महाभियोगाच्या प्रस्तावावर सही नाही. याबाबत जेव्हा काँग्रेसचे नेते कपिल सिब्बल यांना प्रश्न विचारण्यात आला त्यावेळी ते म्हणाले की, मनमोहन सिंग यांना आम्ही या प्रकरणामध्ये मुद्दाम सहभागी केलेले नाही. ते माजी पंतप्रधान असल्याने त्यांना यापासून दूर ठेवावे असे वाटल्याचे सिब्बल म्हणाले. विशेष म्हणजे मनमोहन सिंह सध्या राज्यसभा सदस्य आहेत. तरीही त्यांची सही प्रस्तावावर नाही. 


खुर्शीदही विरोधात 
मनमोहन सिंग यांची सही नाही तर दुसरीकडे काँग्रेसनेते सलमान खुर्शीद यांनीही या प्रकरणी वेगळी भूमिका मांडली आहे. खुर्शीद म्हणाले की, लोया यांचे प्रकरण असो की दुसरे की, सुप्रीम कोर्टाचा निर्णय हा अंतिमच असतो. जर सुप्रीम कोर्याच्या निर्णयावर आक्षेप असेल तर पुनर्विचार याचिका, उपचारात्मक याचिका दाखल करण्याची मुभा असते. 


राजकारण नको 
हे अत्यंत संवेदनशील प्रकरण आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयावर राजकारण करणे योग्य म्हणता येणार नाही, असेही खुर्शीद म्हणाले. वकिलाचा कराळा गाऊन आणि पांढरा बॅन परिधान करणाऱ्याने न्यायालयाच्या प्रत्येक निर्णयावर विचार करूनच बोलायला हवे. 

 

 

बातम्या आणखी आहेत...