आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पीएनबी घोटाळ्यातील आरोपी नीरव मोदी व मेहुल चौकसीविरुद्ध दुसरे अजामीनपात्र वॉरंट

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली- सीबीआयच्या विशेष न्यायालयाने नीरव मोदी आणि मेहुल चौकसी यांच्याविरुद्ध अजामीनपात्र वॉरंट बजावले आहे. १३ हजार कोटींच्या पीएनबी घोटाळ्यात आरोपी असलेले हे दोघे जानेवारीतच देश सोडून पळाले आहेत.


दरम्यान, अजामीनपात्र वॉरंटमुळे सीबीआय इंटरपोलकडे या दोघांच्या नावे रेड कॉर्नर नोटीस बजावण्याची विनंती करू शकेल. या दोन्ही हिरे व्यापाऱ्यांच्या नावे निघालेले हे दुसरे अजामीनपात्र वॉरंट असून यापूर्वी मार्चमध्ये अंमलबजावणी संचालनालयाच्या विनंतीनंतर असे वॉरंट बजावण्यात आले होते.

बातम्या आणखी आहेत...