आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पद्मावत : सेन्सॉरकडून सुटली मात्र 4 राज्यात रिलीज अटकली, गोवा-यूपी मध्येही प्रदर्शन अशक्य

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - पद्मावती फिल्मचे नाव बदलून पद्मावत केल्यानंतरही चित्रपटामागील शुक्लकाष्ट काही संपत नाहीए. देशभरात फिल्मची रिलीज डेट 25 जानेवारी निश्चित करण्यात आली आहे. सेन्सॉर बोर्डाने फिल्मला कात्री लावल्याचे सपशेल नाकारले आहे. तर मध्यप्रदेश, गुजरात, राजस्थान हिमाचल प्रदेश या राज्यांनी फिल्म रिलीज करण्यास नकार दिला आहे. या चारही राज्यांमध्ये भाजप सरकार आहे. गोवा राज्य सरकार चित्रपट प्रदर्शनाला राजी आहे मात्र गोवा पोलिसांनी संरक्षणासाठी अधिक कुमक लागणार असल्याचे म्हटले आहे. उत्तर प्रदेशमध्येही भाजप सरकार आहे, येथे मात्र चित्रपट प्रदर्शनावर अद्याप मौन बाळगण्यात आले आहे. 

रिलीजबद्दल कुठे काय स्थिती.. 
1 - राजस्थानमध्ये सुरुवातीपासून विरोध 
- चित्रपटाच्या चित्रिकरणापासून राजस्थानमधून विरोध होत आला आहे. या राज्यात चित्रपट प्रदर्शीत होईल, याबद्दल अजूनही साशंकता आहे. राजपूत करणी सेनेच्या सुरात सूर मिसळताना राज्य सरकार दिसत आहे.
- आता सेन्सॉर बोर्डाने परवानगी दिली आहे. चित्रपटात काही कट लावले आहे, नावात बदल केला आहे तरीही राजस्थान सरकार फिल्म रिलीज करण्यास तयार नाही. 
- राजस्थानचे गृहमंत्री गुलाबचंद कटारिया म्हणाले, राजस्थानमध्ये पद्मावत रिलीज होणार नाही. 
- याआधी मुख्यमंत्री वसुंधरा राजे यांनी केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री स्मृती इराणी यांना पत्र लिहून पद्मावीत वादात हस्तक्षेप करण्यास सांगितले होते. यात मुख्यमंत्री वसुंधरा राजे यांनी म्हटले होते, चित्रपट रिलीज करण्यापूर्वी त्यातील वादग्रस्त भाग काढावा. 

 

2 - गुजरातमध्येही बंदी 
 - राजस्थाननंतर पद्मावतला मोठा विरोध गुजरातमधून होत आहे. गुजरात राज्य सरकारनेही चित्रपट प्रदर्शित न करण्याचा निर्णय घेतला आहे. गुजरातचे मुख्यमंत्री विजय रुपाणी म्हणाले, की संजय लीला भन्साळींचींची पद्मावत फिल्म गुजरातमध्ये रिलीज होणार नाही. 
 
- एका न्यूज चॅनलसोबत बोलताना रुपाणी म्हणाले, 'कायदा आणि सुव्यवस्थेशी संबंधीत प्रकरण आहे. सध्याच्या स्थितीत फिल्म रिलीज करणे शक्य नाही.'

3 - मध्यप्रदेशमध्येही नाही पाहाता येणार 
- मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी घोषणा केली आहे की पद्मावत मध्यप्रदेशात दाखवला जाणार नाही. शिवराज सिंह चौहान यांनीही कायदा-सुव्यवस्थेचा मुद्दा उपस्थित केल आहे. 
4 - हिमाचलमध्येही बंदी 
- हिमाचल प्रदेशात पद्मावत प्रदर्शनावर बंदी आहे. करणी सेनेप्रमाणेच हिमाचलमध्येही काही संघटना पद्मावतला विरोध करत आहेत. 

 

काय नुकसान होणार 
- मध्यप्रदेश, गुजरात, राजस्थान हे मोठे राज्य आहेत. येथे फिल्म रिलीज झाली नाही तर त्याचा थेट परिणाम कलेक्शनवर होणार आहे. हे तिन्ही हिंदी भाषिक राज्य आहेत आणि येथे मल्टीप्लेक्स आणि सिंगल थिएटरमध्ये फिल्म दाखवली जाणार होती. 

बातम्या आणखी आहेत...