आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Padmavat Release: Haryana Bans Screening After Rajasthan, Madhya Pradesh & Gujarat

\'पद्मावत\'ला हरियाणातही बंदी, राजस्थानसह 3 राज्यांनी आधीच प्रदर्शनला दिला नकार

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - संजय लीला भन्साळींची फिल्म पद्मावतीचे नाव 'पद्मावत' केल्यानंतरही या चित्रपटाच्या प्रदर्शानाचा तिढा सुटलेला नाही. 25 जानेवारीला हरियाणामध्ये फिल्म रिलीज होणार नाही, याला राज्याचे आरोग्यमंत्री अनिल वीज यांनी मंगळवारी दुजोरा दिला. राजस्थान, गुजरात, मध्यप्रदेश पाठोपाठ चित्रपट प्रदर्शनाला विरोध करणारे हरियाणा चौथे राज्य ठरले आहे. उत्तर प्रदेश आणि गोवा येथे 'पद्मावत' फिल्म रिलीज होईल की नाही याबद्दल अजून साशंकता आहे. रविवारी निर्मात्यांनी चित्रपटाच्या रिलीज डेटची अधिकृत घोषणा केली होती. पद्मावत चित्रपट चित्रिकरणापासून वादात अडकला आहे. सेन्सॉर बोर्डाने कोणत्याही कट शिवाय चित्रपटाला प्रमाणपत्र दिल्याचे म्हटले आहे. 

 

IMAX 3D मध्ये रिलीज होणार पद्मावत 
- पद्मावतचे निर्माते भन्साळी प्रोडक्शन आणि वायकॉम 18 मोशन पिक्चर्सने रविवारी सांगितले की फिल्म जगभरात एकाचवेळी IMAX 3Dमध्ये रिलीज होणार आहे. हिंदी, तामिळ आणि तेलगु या तिन्ही भाषांमध्ये चित्रपट रिलीज होणार आहे. 

 

रिलीजबद्दल कुठे काय स्थिती.. 


1 - राजस्थानमध्ये सुरुवातीपासून विरोध 
- चित्रपटाच्या चित्रिकरणापासून राजस्थानमधून विरोध होत आला आहे. या राज्यात चित्रपट प्रदर्शीत होईल, याबद्दल अजूनही साशंकता आहे. राजपूत करणी सेनेच्या सुरात सूर मिसळताना राज्य सरकार दिसत आहे.
- आता सेन्सॉर बोर्डाने परवानगी दिली आहे. चित्रपटात काही कट लावले असल्याचे म्हटले जाते, नावात बदल केला आहे तरीही राजस्थान सरकार फिल्म रिलीज करण्यास तयार नाही. 
- राजस्थानचे गृहमंत्री गुलाबचंद कटारिया म्हणाले, राजस्थानमध्ये 'पद्मावत' रिलीज होणार नाही. 
- याआधी मुख्यमंत्री वसुंधरा राजे यांनी केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री स्मृती इराणी यांना पत्र लिहून 'पद्मावत' वादात हस्तक्षेप करण्यास सांगितले होते. यात मुख्यमंत्री वसुंधरा राजे यांनी म्हटले होते, चित्रपट रिलीज करण्यापूर्वी त्यातील वादग्रस्त भाग काढावा.

2 - गुजरातमध्येही बंदी
- राजस्थाननंतर 'पद्मावत'ला मोठा विरोध गुजरातमधून होत आहे. गुजरात राज्य सरकारनेही चित्रपट प्रदर्शित न करण्याचा निर्णय घेतला आहे. गुजरातचे मुख्यमंत्री विजय रुपाणी म्हणाले, की संजय लीला भन्साळींचींची 'पद्मावत' फिल्म गुजरातमध्ये रिलीज होणार नाही. 

- एका न्यूज चॅनलसोबत बोलताना रुपाणी म्हणाले, 'कायदा आणि सुव्यवस्थेशी संबंधीत प्रकरण आहे. सध्याच्या स्थितीत फिल्म रिलीज करणे शक्य नाही.'

3 - मध्यप्रदेशमध्येही नाही पाहाता येणार
- मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी घोषणा केली आहे की पद्मावत मध्यप्रदेशात दाखवला जाणार नाही. शिवराज सिंह चौहान यांनीही कायदा-सुव्यवस्थेचा मुद्दा उपस्थित केल आहे. 
4 - हिमाचलमध्येही बंदी
- हिमाचल प्रदेशात 'पद्मावत' प्रदर्शनावर बंदी आहे. करणी सेनेप्रमाणेच हिमाचलमध्येही काही संघटना पद्मावतला विरोध करत आहेत.

 

काय नुकसान होणार
- मध्यप्रदेश, गुजरात, राजस्थान, हरियाणा हे मोठे राज्य आहेत. येथे फिल्म रिलीज झाली नाही तर त्याचा थेट परिणाम कलेक्शनवर होणार आहे. हे चारही हिंदी भाषिक राज्य आहेत आणि येथे मल्टीप्लेक्स आणि सिंगल थिएटरमध्ये फिल्म दाखवली जाणार होती. 

बातम्या आणखी आहेत...