आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पाककडून सातव्या दिवशीही शस्त्रसंधी उल्लंघन, गोळीबारात 8 महिन्यांच्या चिमुरड्याचा मृत्यू

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

श्रीनगर - पाकिस्तानकडून सलग सात दिवसांपासून शस्त्रसंधीचे उल्लंघन केले जात आहे. पाकिस्तानी लष्कर अरनिया आणि आरएसपुरा सेक्टरमध्ये मंगळवारी रात्रीपासून गोळीबार केला आहेत. भारतीय लष्कर त्याला जशास तसे प्रत्युत्तर देत आहे. त्यापूर्वी सोमवारी पाककडून इंटरनॅशनल बॉर्डर आणि एलओसीवर चौक्या आणि निवासी भागात मोर्टार हल्ले करण्यात आले. त्यात पल्लांवाला सेक्टरच्या शेरपलाई भागात घराबाहेर झोपलेल्या आठ महिन्याच्या एका चिमुरड्याचा मृत्यू झाला. अरनिया सेक्टरमध्ये एका पोलिस अधिकाऱ्यासह सहा जण जखमी झाले आहेत. 


सरकारने तोडगा काढण्याची मागणी 
आंतरराष्ट्रीय सीमेवरील सुचेतगडच्या नागरिकांचे म्हणणे आहे की, गोळीबार रोजच होत आहे. आम्ही सर्व फार घाबरलेलो आहोत त्यामुळे रात्रीच्या वेळी झोपूही शकत नाही. आम्हाला गुरे चारायला नेता येत नाहीत. सरकारने यावर तोडगा काढण्याची आमची विनंती आहे. 


काय म्हणाले राजनाथ..
केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह म्हणाले की, यामागचे कारण तर लक्षात येणे कठीण आहे. त्यासाठी खूप संशोधन करावे लागेल. पण पाकिस्तानने हे प्रकार बंद करायला हवे. ते आधी गोळी चालवतील तर आम्ही काय करणार. गृह राज्यमंत्री हंसराज अहिर म्हणाले की, संपूर्ण जगच हा प्रकार पाहत आहे. आमचे जवान शांत बसणार नाहीत, त्यांना सडेतोड प्रत्युत्तर दिले जाईल. 

 

 

 

बातम्या आणखी आहेत...