आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भारताच्या कारवाईने पाकची घबराट, LoCवर 7 सैनिकांना टिपल्यानंतर DGMO बैठकीची मागणी

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
चार वर्षानंतर दोन्ही देशांचे डीजीएमओ आमने-सामने येण्याची शक्यता आहे. - Divya Marathi
चार वर्षानंतर दोन्ही देशांचे डीजीएमओ आमने-सामने येण्याची शक्यता आहे.

इस्लामाबाद/नवी दिल्ली - बॉर्डर आणि विशेषतः लाइन ऑफ कंट्रोलवर (LoC) भारतीय लष्कारने दिलेल्या सडेतोड उत्तरानंतर पाकिस्तान भयभीत झाला आहे. सोमवारी झालेल्या फायरिंगमध्ये त्यांचे 7 सैनिक मारले गेल्यानंतर पाकिस्तान आता दोन्ही देशांच्या DGMO बैठकीसाठी आग्रह करण्याचा विचार करत आहे. एलओसीवर शांतता राहावी हा  बैठकीचा उद्देश आहे. विशेष म्हणजे, 4 वर्षांनंतर प्रथमच दोन्ही देशांचे DGMO समोरासमोर येण्याची शक्यता आहे. वास्तविक दोन्ही देशांचे DGMO हॉटलाइनवर बातचीत करत असतात. 

 

7 सैनिक मारले गेल्यानंतर जागे झाले सरकार 
- पाकिस्तानकडून सोमवारी बॉर्डरवर शस्त्रसंधीचे उल्लंघन करण्यात आले होते. भारतीय लष्कारने त्याला तोडीसतोड उत्तर देत प्रत्युत्तरादाखल केलेल्या फायरिंगमध्ये पाकिस्तानचे 7 सैनिक टिपले. वास्तविक पाकिस्ताने 4 जवान मारले गेल्याचे मान्य केला आहे. 
- पाकिस्तानचे वृत्तपत्र 'द डॉन'च्या वृत्तानुसार, एलओसीवर भारताकडून झालेल्या कडक कारवाईनंतर पाकिस्तान सीनेटच्या संरक्षण समितीची तत्काळ बैठक बोलावण्यात आली. यामध्ये भारताचे डायरेक्टर जनरल्स ऑफ मिलिटरी ऑपरेशन्स (DGMO) यांची बैठक बोलावण्याचे अपील केले आहे. एका वृत्तात असेही म्हटले आहे, की पाकिस्तान DGMO बैठकीची मागणी मंगळवारी करण्याची शक्यता आहे. 
- सीनेटर मुशाहिद हुसैन पाकिस्तानच्या संरक्षण समितीचे अध्यक्ष आहेत. त्यांनी मीडियाच्या एकाही प्रश्नाचे उत्तर दिले नाही. 

मीडिया रिपोर्ट्सनुसार चार वर्षांपूर्वी दोन्ही देशांच्या DGMOची वाघा बॉर्डरवर बैठक झाली होती. त्याआधी 14 वर्षांपूर्वी अशी बैठक झाली होती. 
- दोन्ही देशांचे  DGMO हे हॉटलाइनद्वारे एकमेकांच्या नेहमीच संपर्कात असतात. मात्र पाकिस्तानने बैठकीची मागणी केली तर दोन्ही देशांचे मिलिटरी अधिकारी चार वर्षानंतर प्रथमच आमने-सामने येतील. 
- पाकिस्तानचा आरोप आहे की भारताने गेल्या वर्षभरात 1881 वेळा शस्त्रसंधीचे उल्लंघन केले. यामध्ये 87 लोक मारले गेले आहेत. 
- पाकिस्तानच्या एका अधिकाऱ्याने आरोप केला की भारतीय लष्कराने पाकिस्तानच्या कम्युनिकेशनची सर्व लाइन उद्धवस्त केली आहे. 

बातम्या आणखी आहेत...