आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नियंत्रण रेषेवर दिसले पाकिस्तानी हेलिकॉप्टर; 300 मीटर आत घुसले, परत गेले

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पाकिस्तानचे हेलिकॉप्टर LoC पार करुन 300 मीटर आत आले होते. - Divya Marathi
पाकिस्तानचे हेलिकॉप्टर LoC पार करुन 300 मीटर आत आले होते.

जम्मू- जम्मू-काश्मीरच्या पूंछ जिल्ह्यात नियंत्रण रेषेजवळ (एलओसी) बुधवारी एक पाकिस्तानी हेलिकॉप्टर उडत असलेले दिसले. मात्र, या हेलिकॉप्टरने हवाई सीमेचे उल्लंघन केले नाही, असे भारतीय लष्करातर्फे स्पष्ट करण्यात आले.  


लष्कराच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, एलओसीजवळ बुधवारी सकाळी एक पाकिस्तानी हेलिकॉप्टर उडत असलेले दिसले. पण त्याने सीमारेषा ओलांडली नाही तसेच भारतीय हवाई सीमेचे उल्लंघनही केले नाही. हे हेलिकॉप्टर कुंपणाच्या जवळ आले होते, या वेळी भारतीय सैनिक पूर्णपणे सज्ज होते.  काही दिवसांपूर्वीही एक पाकिस्तानी हेलिकॉप्टर एलओसीजवळ खारी कर्मारा भागात उडत असल्याचे दिसले होते. त्याआधी भारतीय लष्कराने पाकिस्तान बॉर्डर अॅक्शन टीमचा (बॅट) हल्ला अयशस्वी केला होता. 

 

केव्हा आले होते हेलिकॉप्टर
- आर्मीच्या सूत्रांनी सांगितले, की ही घटना 21 फेब्रुवारी रोजी सकाळी 9.45 ते 10 वाजता दरम्यान घडली आहे. हेलिकॉप्टर जेव्हा पाकव्याप्त काश्मीरमध्ये (PoK) होते, तेव्हा फायरिंगची अॅक्शन झाली नाही. 

 

आंतरराष्ट्रीय नियमांचा हा भंग आहे का? 
- नक्कीच हे आंतरराष्ट्रीय नियमांचे उल्लंघन आहे. आंतरराष्ट्रीय नियमांनुसार रोटरी विंग एअरक्राफ्ट LoC च्या एक किलोमीटरच्या परिघात येऊ शकत नाही. फिक्स विंग एअरक्राफ्टसाठी हा नियम 10 किलोमीटर पर्यंतचा आहे. 

 

पाकिस्तान आर्मीने काय सांगितले? 
- पाकिस्तान आर्मीकडून आतापर्यंत यावर स्पष्टीकरण आलेले नाही. मात्र भारतीय लष्कराने म्हटले आहे, 'हे एअर स्पेस व्हॉयलेशन नाही. मात्र दोन्ही देशांच्या संमतीचे उल्लंघन नक्कीच आहे. हे प्रकरण पाकिस्तानसमोर उपस्थित केले जाईल.'

बातम्या आणखी आहेत...