आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Surgical Strikeच्या 2 वर्षानंतर प्रथमच शांततेसाठी पाकिस्तानचा पुढाकार, भारताने दिली मंजूरी

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - भारत आणि पाकिस्तान या दोन्ही देशांनी शस्त्रसंधी कराराचे काटेकोर पालन करण्याचा निर्णय घेतला आहे. 15 वर्षांपूर्वी दोन्ही देशांमध्ये शस्त्रसंधी करार झाला होता, मात्र पाकिस्तानकडून त्याचे वारंवार उल्लंघन होत आले आहे. मंगळवारी सायंकाळी 6 वाजता दोन्ही देशांच्या डीजीएमओ यांच्यात हॉटलाइनवर चर्चा झाली, यावेळी पाकिस्तानकडून देण्यात आलेला शांततेचा प्रस्ताव भारताने स्वीकारला आहे.  29 सप्टेंबर 2016 ला झालेल्या सर्जिकल स्ट्राइकनंतर ही पहिलीच वेळ आहे की दोन्ही देशांनी शस्त्रसंधीचे पालन करण्यावर एकमत दर्शवले आहे. 

 

सुषमा स्वराज यांनी एक दिवस आधीच पाकला सुनावले होते खडे बोल 
- परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांनी सोमवारी पत्रकारांसोबतच्या बातचीतमध्ये पाकिस्तानच्या मुद्द्यावर सविस्तर उत्तर दिले होते. जोपर्यंत सीमेवर मृतदेह उचलेले जात आहे, अशा परिस्थितीत चर्चा योग्य नसल्याचे त्या म्हणाल्या होत्या. 

 

जम्मूमधील सर्व सेक्टरमध्ये पाकिस्तानकडून आठवड्यापूर्वीच झाला होता गोळीबार 
- जम्मू मधील आंतरराष्ट्रीय सीमेवर पाकिस्तानकडून गेल्या आठवड्यात बुधवारी शस्त्रसंधीचे उल्लंघन करण्यात आले होते. कठुआ, सांबा आणि आरएसपूरा भागातील वस्त्या आणि चौक्यांवर मोर्टर हल्ला करण्यात आला होता. यात 24 तासांत 7 नागरिकांसह बीएसएफचे पाच जवान शहीद आणि 35 जण जखमी झाले होते. 

बातम्या आणखी आहेत...