आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बीटेक-बीसीए करणाऱ्या PAK समर्थक दोन काश्मिरी विद्यार्थ्यांना पंजाबातून अटक, 500 भारतीय वेबसाइट हॅक

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कुलगाम येथील आदिल हुसैन तेली हा जालंधर येथील सेंट सोल्जर कॉलेजमध्ये बीसीएच्या शेवटच्या वर्षाला होता. (फाइल) - Divya Marathi
कुलगाम येथील आदिल हुसैन तेली हा जालंधर येथील सेंट सोल्जर कॉलेजमध्ये बीसीएच्या शेवटच्या वर्षाला होता. (फाइल)

नवी दिल्ली - दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलने शुक्रवारी दोन काश्मीरी हॅकर्सला पंजाबातून अटक केली आहे. पोलिसांच्या माहितीनुसार आरोपींनी पाकिस्तानी हॅकर्सच्या मदतीने भारतातील जवळपास 500 वेबसाइट हॅक केल्या आहेत. शाहिद मल्ला आणि आदिल हुसैन हे बी.टेक आणि बीसीएचे विद्यार्थी आहेत. त्यांच्याकडील लॅपटॉप, मोबाइल, सीमकार्ड आणि मेमरी डिव्हाइस इतर साहित्य जप्त करण्यात आले आहे.

 

सोशल मीडियावर चिथावणीखोर वक्तव्य 
- पोलिस तपासत समोर आले, की दोघेही पाकिस्तान समर्थक आहेत. सोशल मीडियावर ते कायम चिथावणीखोर वक्तव्य करत होते. 2014 पासून दोघेही पाकिस्तान समर्थक झाल्याचे त्यांनी मान्य केले. पोलिस म्हणाले, आरोपींचे म्हणणे आहे की ते भारतीय नाही तर पाकिस्तानी आहेत. आमचे देश पाकिस्तान आहे. 

- आरोपी युवक हे सोशल मीडियावर काश्मीरला स्वतंत्र करण्यासाठी मोहिम राबवत असल्याचे पोलिस म्हणाले. भारतीय वेबसाइट हॅक केल्यानंतर ते फ्री काश्मीर आणि पाकिस्तान झिंदाबाद असे मेसेज टाकत होते. 
- मागील वर्षी एप्रिल - मे महिन्यात इंटरनेटवरील बंदीवर तोडगा म्हणून आरोपींनी स्थानिक युवकांना व्हर्च्युअल प्रायव्हेट नेटवर्क (व्हीपीएन) बद्दल माहिती दिली होती. यामुळे एकमेकांना मेसेज पाठवणे शक्य होते. 

 

आयएसआयसोबत कनेक्शनची शक्यता 
- पोलिसांनी सांगितल्यानुसार, दोन्ही आरोपी हे हॅकिंग ग्रुप टीमचे सक्रीय सदस्य होते. ही टीम देशविरोधी कारवायांसाठी ओळखली जाते. काश्मीरी युवकांना देशविरोधी कृत्य करण्यास प्रोत्साहन देण्यासाठी ही टीम काम करत असल्याचा आरोप आहे. यांचे आयएसआयसोबतही संबंध असल्याची शक्यता आहे. 
- पोलिस सध्या दोघांची कसून चौकशी करत आहे. वेबसाइट हॅक केल्यानंतर काय केले होते. बँकेची वेबसाइट हॅक करण्याचा काय उद्देश होता. यांची कोणासोबत लिंक आहे. काश्मीरमध्ये इंटरनेट बंद झाल्यानंतर ते त्यांच्या प्रायव्हेट नेटवर्कने संपर्कात राहात होते. 

 

दोघे पंजाबात राहात होते
- शुक्रवारी पहाटे 3 वाजता शाहित मल्ला याला पंजाबातील राजपुरा येथील शीतल कॉलनीमधून अटक केली. तो येथे किरायाच्या घरात राहात होता. येथील आर्यन ग्रुप ऑफ कॉलेजमध्ये तो बीसीएच्या द्वितीय वर्षाचा विद्यार्थी आहे.   मल्ला हा मुळचा काश्मीरी असून, जम्मू काश्मीरमधील बारामुला येथील तो रहिवासी आहे. 
- दुसरा आरोपी आदिल हुसैन तेली हा जालंधरमधील सेंट सोल्जर कॉलेजमध्ये बीसीएच्या शेवटच्या वर्षाला होता. 

एनजीटी आणि दिल्लीच्या बिझनेसमॅनची वेबसाइट हॅक केल्याने आले लक्षात 
- सायबर क्राइम सेलकडे दोन केसेस आल्या होत्या. या दोघांनी एनजीटी आणि दिल्लीतील एका बिझनेसमॅनची वेबसाइट हॅक केली होती. सायबर क्राइम टीम जवळपास 4 महिन्यांपासून हॅकर्सच्या मागावर होते. 
- फॉरेन्सिक चौकशीत क्लू मिळाला की हॅकर पंजाबात बसलेले आहेत. त्यानंतर टीम तयार करुन त्यांना अटक केली. 

बातम्या आणखी आहेत...