आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बिनबुडाचे आरोप करणे भारताची सवय, हालचाली करू नका, सुंजवां हल्ल्यानंतर पाकची भूमिका

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

इस्लामाबाद/श्रीनगर - जम्मूमध्ये सुंजवां आर्मी कॅम्पवरील हल्ल्यानंतर पाकिस्तानने भारताला इशारा दिला आहे. पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले की, कोणत्याही प्रकरणाची योग्य पद्धतीने चौकशी सुरू होण्यापूर्वीच अशाप्रकारे बेजबाबदारपणे आरोप करणे भारतीय अधिकाऱ्यांची सवय आहे. न्यूज एजन्सीतील वृत्तानुसार PAK च्या परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले की, आम्ही आंतरराष्ट्रीय कम्युनिटीला विनंती करतो की, त्यांनी भारताच्या ताब्यातील काश्मीर (IoK) मध्ये अत्याचार आणि मानवाधिकारांचे उल्लंघन बंद करावे. तसेच लाइन ऑफ कंट्रोलच्या पलिकडे कोणत्याही प्रकारचे चुकीचे कृत्य करणे टाळावे. उरी अटॅक आणि शस्त्रसंधी उल्लंघनाला प्रत्युत्तर देताना भारताने दोन वेळा लाइन ऑफ कंट्रोल (LoC)पार करून पाकव्याप्त काश्मीर (PoK) मध्ये सर्जिकल स्ट्राइक केली आहे. 


पाकने का केले असे वक्तव्य?
- जम्मू-काश्मीरमध्ये 3 दिवसांत दोन दहशतवादी हल्ले झाले आहेत. पहिला हल्ला 10 फेब्रुवारीला पहाटे जम्मूच्या सुंजवांमध्ये आर्मी कॅम्पवर झाला होता. येथे 5 जवान शहीद झाले आणि एका नागरिकाने प्राणही गमावले. प्रत्युत्तराच्या कारवाईत 3 दहशतवादी मारले गेले. दुसरा हल्ला 12 फेब्रुवारीला श्रीनगरच्या सीआरपीएफ कॅम्पवर झाला. या गोळीबारात एक जवान शहीद झाला. 
- जम्मू-कश्मीर पोलिसांचे डीजीपी एसपी वैद म्हणाले होते की, आम्ही काही संभाषणांना इंटरसेप्ट केले आहे. त्यात हल्ल्यांमागे जैश-ए-मोहम्मद (JeM) चा हात असल्याचे संकेत मिळाले आहेत. पण मंगळवारी सुंजवान आणि सीआरपीएफ कॅम्पवरील हल्ल्याची जबाबदारी लश्कर-ए-तोयबाने स्वीकारली आहे. 


केव्हा आणि का केले भारताने सर्जिकल स्ट्राइक?

# सर्जिकल स्ट्राइक-1
केव्हा झाले :
29 सप्टेंबर 2016 ला भारताने LoC पलिकडे PoK मध्ये सर्जिकल स्ट्राइक केले. त्यात दहशतवादी तळांचा खात्मा करून 40 हून अधिक दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात आले. 
का झाले : 18 सप्टेंबर 2016 ला उरीमध्ये आर्मी बेसवर टेरर अटॅक झाला होता. त्या हल्ल्यात 19 जवान शहीद झाले होते. भारताने JeM चा हात असल्याचा आरोप केला होता. पण कोणत्याही संघटनेने हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली नाही. त्याला प्रत्युत्तर म्हणूनच सर्जिकल स्ट्राइक करण्यात आले होते. 

# सर्जिकल स्ट्राइक-2
केव्हा झाले :
26 डिसेंबर 2017 ला भारतीय लष्कराच्या पथकाने LoC पलिकडे जाऊन 45 मिनिटांत 3 पाकिस्तानी सैनिकांना मारले होते. हे पथक 5 कमांडोंचे होते. 
का झाले : 23 डिसेंबर 2017 ला राजौरीमध्ये झालेल्या शस्त्रसंधी उल्लंघनात 4 भारतीय जवान शहीद झाले होते. सर्जिकल स्ट्राइक-2 त्याचाच परिणाम असे म्हटले गेले. 


यावेळी कुठे झाले हल्ले?
सुंजवां अटॅक -
10 फेब्रुवारीला पहाटे दहशतवादी कॅम्पमध्ये दाखल झाले. हल्ल्यात 5 जवान शहीद झाले आणि एका नागरिकाचा मृत्यूदेखिल झाला. प्रत्युत्तराच्या कारवाईत आर्मीने 3 दहशतवाद्यांना कंठस्नान घातले. 
जम्मू CRPF कॅम्प - 12 फेब्रुवारीच्या सकाळी सीआरपीएफ कॅम्पमध्ये दहशतवाद्यांनी हल्ला केला. हल्ल्यात एक सीआरपीएफ जवान शहीद झाला होता. 

 

बातम्या आणखी आहेत...