आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

यामुळे मोडले सलमान रश्दींचे चौथे लग्न, \'तलाक\'नंतर पद्मा लक्ष्मीने केला होता हा आरोप

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बुकर पुरस्कार विजेते भारतीय वंशाचे ब्रिटीश लेखक सलमान रश्दी यांचा आज 70वा वाढदिवस आहे. वादग्रस्त लिखानामुळे ते चर्चेत असतात. त्यांचे 'द सॅटेनिक व्हर्सेस' हे पुस्तक भारतात बॅन आहे. वादग्रस्त लिखानासोबत रश्दी हे त्यांच्या वैयक्तिक आयुष्यामुळेही चर्चेत राहातात. त्यांनी वयाच्या 51व्या वर्षी आपल्यापेक्षा 23 वर्षे लहान भारतीय वंशाची अमेरिकन मॉडेल पद्मा लक्ष्मीसोबत लग्न केले होते. तेव्हा पद्मा लक्ष्मी सिंगल आणि 28 वर्षांची होती. 

 

सेक्स ठरला होता घटस्फोटाचे कारण 
- पद्मा लक्ष्मीची ऑटोबायोग्राफी खळबळजनक ठरली होती. 
- सलमान रश्दींसोबत तिचा विवाह फक्त तीन वर्षे टिकला होता. तिचे हे पहिलेच लग्न होते तर रश्दींचे चौथे. 
- तीन वर्षांत पद्मा लक्ष्मीने रश्दींपासून विभक्त होण्याचा निर्णय घेतला. त्याचे कारण तिने ऑटोबायोग्राफीमध्ये सांगितले आहे. 
- इंडियन अमेरिकन मॉडेल, अॅक्ट्रेस आणि सेलिब्रिटी शेफ राहिलेल्या पद्मा लक्ष्मीने रश्दींसोबतचे लग्न म्हणजे 'एक चुकीची गुंतवणूक' असल्याचे म्हटले होते. रश्दींना तिने निष्ठूर हसबंड म्हटले होते. 
- पद्मा लक्ष्मी आणि रश्दी यांचे 2004 मध्ये लग्न झाले होते. त्यांची पहिली भेट 1999 मध्ये झाली होती. 
- लग्न झाले तेव्हा पद्मा लक्ष्मी 28 तर रश्दी 51 वर्षांचे होते. लक्ष्मीने तिच्या पुस्तकाच्या प्रमोशनवेळी दिलेल्या मुलाखतीत म्हटले होते, 'मी त्यांच्यासोबतचे लग्न टिकण्याचे खूप प्रयत्न केले, मात्र आमच्या नात्यात फारच घडबड झालेली होती.'
- लक्ष्मीने म्हटले होते, की सलमान रश्दी हे असंवेदनशील होते. त्यांच्या असंवेदनशीलतेचा किस्साही पद्मा लक्ष्मीने सांगितला होता. 
- लक्ष्मी म्हणाली होती, 'सेक्स दरम्यान मला फार त्रास होत होता. त्या भयानक त्रासामुळे मी नकार देत होते. त्यावर त्यांचे उत्तर होते,- किती सहज तुला बहाना करता येतो. माझ्या त्रासाचे कारण शरीरांतर्गत होता. त्यामुळे मला पाच तासांची सर्जरीही करावी लागली होती. हॉस्पिटलमधून घरी परत आल्यानंतर दुसऱ्या दिवशी ते हे सांगून घरातून बाहेर पडले की, अखेर शो सुरु राहिला पाहिजे. मला त्यांचे बोलणे कळले नाही. आणि यामुळेच आमच्यात गैरसमज वाढत गेले.'

- रश्दी घरातून बाहेर पडले आणि त्याच वेळी लक्ष्मीने त्यांच्यापासून वेगळे होण्याचा निर्णय घेतला. ती थेट वकिलाकडे पोहोचली. 2 जुलै 2007 ला दोघे विभक्त झाले. 

 

बातम्या आणखी आहेत...