आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मूर्तिभंगाचे संसदेत पडसाद : खासदारांचा राज्यसभेच्या वेलमध्ये उतरून गोंधळ, कामकाज 2 पर्यंत तहकूब

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - संसदेच्या बजेट सत्र सुरू होऊन 3 दिवस झाले आहेत, परंतु कोणतेही कामकाज होऊ शकलेले नाही. बुधवारीही राज्यसभेत विरोधी पक्षातील खासदारांनी मूर्ती तोडण्यावरून आणि आंध्र प्रदेशला विशेष दर्जा देण्याबद्दल वेलमध्ये प्रदर्शन केले. सभापती वेंकय्या नायडू यांनी सर्वांना आपापल्या जागी बसण्याचे आवाहन केले. परंतु त्यांचे म्हणणे न ऐकल्याने नायडूंनी राज्यसभेची कामकाज 2 वाजेपर्यंत तहकूब केले. त्रिपुरामध्ये भाजप बहुमताने आल्यानंतर लेनिन यांच्या दोन मूर्ती तोडण्यात आल्या. दुसरीकडे, तमिळनाडूत समाजसुधारक रामासामी पेरियार यांची मूर्तीचीही विटंबणा करण्यात आली.


संसदेत सातत्याने होत आहे गोंधळ
- 5 मार्चपासून बजेट सत्राचे दुसरे चरण सुरू आहे. नीरव मोदी-मेहुल चौकसी, आंध्र प्रदेशला विशेष दर्जा देण्यासाठी हंगामा झाला.
- मंगळवारी लगातार दुसऱ्या दिवशीही कोणतेही कामकाज होऊ शकले नाही. पीएनबी घोटाळ्यावर काँग्रेस व इतर विरोधी पक्षांच्या गोंधळामुळे दोन्ही सदनांची कार्यवाही तहकूब करावी लागली. दिवसभराच्या स्थगनाआधी सर्वात आधी लोकसभेत एक वेळा आणि राज्यसभेत 3 वेळा कार्यवाही स्थगित करावी लागली. संसदेच्या या गतिरोधासाठी सत्ता पक्ष आणि विपक्षाने एकमेकांना जबाबदार ठरवले आहे.  

बातम्या आणखी आहेत...