आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अर्थसंकल्पीय अधिवेशन : गोंधळामुळे 13 दिवसांत फक्त 8 तास कामकाज, 11 कोटींचा चुराडा

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाची सुरुवात 5 मार्चला झाली होती. त्यानंतर आता 13 दिवस उलटले आहेत. यादरम्यान दोन्ही सभागृहांमध्ये एकूण फक्त 7 तास 57 मिनिटांचेच कामकाज झाले. त्यात लोकसभा 3 तास 31 मिनिटे आणि राज्यसभेचे कामकाज जवळपास 4 तास 26 मिनिटे चालले. सरकारी अंदाजानुसार संसदेच्या एका मिनिटाच्या कार्यवाहीवर 2.5 लाख रुपये खर्च होतात. संसदेत दोन्ही सभागृहांमध्ये प्रत्येकी 74 तासांचा वेळ वाया गेला. त्यानुसार जनतेच्या कमाईतील 11.10 कोटी रुपयांचा चुराडा झाला आहे. 


पीएनबी घोटाळ्यापासून अविश्वास प्रस्तावापर्यंत.. 
- गोंधळाची सुरुवात पीएनबी घोटाळ्याच्या मुद्द्यावरून झाली होती. तेव्हापासून आता थेट मोदी सरकारच्या विरोधातील पहिल्या अविश्वास प्रस्तावाचा मुद्दा समोर आला आहे. यादरम्यान गोंधळामध्ये अर्थविधेयक चर्चा न करताच पारीत करण्यात आले होते. 
- त्याशिवाय लोकसभेमध्ये दोन बिलं सादर करण्यात आली आणि दोन्ही मंजूरही झाली. चिट फंड दुरुस्ती विधेयक आणि फरार आर्थिक गुन्हेगारांची देशातील संपत्ती जप्त करण्याच्या विधेयकाचा यात समावेश होता. 


74 तासांचा वेळ वाया गेला 
लोकसभा

- पाच वेळा फक्त 2 मिनिटांचे कामकाज होऊन, लोकसभा स्थगित करण्यात आली आहे. 74.29 तासांचे वेळ यामध्ये वाया गेला. 
राज्यसभा
पाच वेळा कामकाज केवळ 1 मिनिटांत तहकूब करम्यात आले. एकूण 73.34 तासांचा वेळ वाया गेला. 


एवढे काम प्रलंबित 
राज्यसभेमध्ये सध्या 39 विधेयके प्रलंबित आहेत. दुसरीकडे लोकसभेत 28 पैकी 21 बिल प्रलंबित आहेत. स्थायी आणि संयुक्त समित्यांकडे 7 बिले आहेत. 


फक्त एक दिवस झाले सलग 1 तासाचे कामकाज 
राज्यसभेने 8 मार्चला संपूर् एक तास आंतरराष्ट्रीय महिला दिनाला महिलांच्या मुद्द्यावर चर्चा केली होती. या 13 दिवसांत फक्त त्या दिवशीच संसदेचे कामकाज सलग तासभर चालले. 

बातम्या आणखी आहेत...