आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शैलजा Murder Case : या व्यक्तीने सर्वात आधी पाहिली डेडबॉडी, पोलिसांना केला फोन

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

न्यूज डेस्क - शैलजा द्विवेदी मर्डर केसमध्ये रोज काहीतरी नवनवीन खुलासे होत आहेत. हत्येनंतर शैलजाच्या मृतदेहाची विल्हेवाट लावण्याचा पुरेपूर प्रयत्न करण्यात आला होता. पण पोलिसांना या डेडबॉडीबद्दल माहिती मिळाली आणि त्यानंतर हळू हळू हे प्रकरण उलगडत गेले. पण सर्वात आधी शैलजाचा मृतदेह कोणी पाहिला होता हे आता समोर आले आहे. 


शैलजा द्विवेदी यांचा मृतदेह निखिल हांडा याने फेकून दिला होता. तो मृतदेह एका रिक्षा ड्रायव्हर दीपक आणि त्याच्या चार सहकाऱ्यांनी पाहिला होता. बरार स्क्वेअरजवळ या सर्वांना तो मृतदेह दिसला त्यानंतर त्यांनी पोलिसांना याबाबत माहिती दिली होती. सुरुवातीला दीपक आणि त्याच्या मित्रांना मृतदेह कोणाचा आहे याबाबत काहीही माहिती नव्हती. टीव्हीवर बातम्या पाहिल्यानंतर त्यांना या संपूर्ण प्रकरणाबाबत माहिती मिळाली. 


असे कळले मृतदेहाबाबत 
दीपक आणि त्याचे काही मित्र घटनास्थळापासून सुमारे अर्धाकिलोमीटर अंतरावर बसलेले होते. त्यावेळी एका पाण्याच्या टँकरवाल्याने त्यांना येऊन सांगितले की, काही अंतरावर एक महिला रोडवर पडलेली आहे. दीपक आणि त्याच्या मित्रांना वाटले की ही महिला आपल्या झोपडपट्टीतील महिलांपैकी एखादी असू शकते. त्यामुळे ते त्याठिकाणी गेले. त्यांनी प्रत्यक्ष पाहिले तेव्हा महिला एखाद्या श्रीमंत कुटुंबातील असेल असे त्यांना वाटले. त्यामुळे त्याने पोलिसांना फोन केला. 


निखिलने केला अपघात भासवण्याचा प्रयत्न 
मेजर निखिल हांडाने शैलजा हिती चाकून गळा कापून हत्या केली होती. पण या हत्येला अपघाताचे रुप देण्यासाठी त्याने मृतदेह संबंधित ठिकाणी आणून टाकला आणि त्यानंतर तो मृतदेह तीन चार वेळा कारने चिरडून तो त्याठिकाणाहून निघून गेला होता. 

 

बातम्या आणखी आहेत...