आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

केरळमध्ये पेट्रोल-डिझेलच्या दरात 1 रुपया कपातीचा निर्णय, 1 पैसा कपातीवरुन राहुल गांधींचा मोदींवर निशाणा

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - केरळ सरकारने बुधवारी पेट्रोल आणि डिझेलच्या दरात 1-1 रुपयांची कपात करण्याचा निर्णय घेतला आहे. राज्यात 1 जूनपासून नवीन दर लागू होणार आहेत. दुसरीकडे, सलग 16 दिवस इंधन दरवाढीने होरपळलेल्या जनतेला आज दिलासा मिळण्याची शक्यता होती, त्यावरही तेल कंपन्यांनी विरजण घातले आहे. सुरुवातीला इंधनाच्या दरात 60 ते 63 पैसे कपात करण्याचा निर्णय जाहीर केला, मात्र सकाळी 11 वाजता कंपन्यांनी घुमजाव करत जाहीर केलेली दरकपात ही तांत्रिक चुकीने झाल्याचे सांगत पेट्रोल-डिझेलच्या दरात फक्त 1 पैशाची कपात केली. गेल्या 16 दिवसांमध्ये पेट्रोल आणि डिझेलच्या दरात सातत्याने वाढ होत पेट्रोल 4 रुपये आणि डिझेल 3.62 रुपये प्रति लिटरने वाढले आहे. आज झालेल्या एक पैशाच्या दरकपातीवरुन विरोधी पक्ष काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी मोदी सरकारवर निशाणा साधला आहे. 

 

आयओसीएलची सारवासारव : तांत्रिक गडबड 
- इंडियन ऑइल कॉर्पोरेशनने म्हटले आहे की तांत्रिक बिघाडामुळे वेबसाइटवर पेट्रोल-डिझेलेचे चुकीचे दर पोस्ट झाले होते, आता ते सुधारण्यात आले आहे. इंधनाच्या दरात आज फक्त 1 पैसा कपात झाली आहे. 

 

केरळमध्ये 1 जूनपासून पेट्रोल-डिझेल 1 रुपया स्वस्त 
- केरळचे मुख्यमंत्री पी. विजयन यांनी म्हटले आहे, की राज्य सरकारने पेट्रोल-डिझेलच्या दरात प्रत्येकी 1 रुपया कपात करण्याचा निर्णय घेतला आहे. नवे दर राज्यात 1 जूनपासून लागू होतील. 

 

उर्वरित देशातही दर कपातीची शक्यता 
- इंडियन ऑइल कॉर्पोरेशच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाचे दर कमी झाले आहेत. डॉलरच्या तुलनेत रुपया मजबूत स्थिती आहे. यामुळे येत्या काही दिवसांत पेट्रोल-डिझेलच्या दरांवर त्याचा परिणाम होण्याची शक्यता आहे. 

 

7 दिवसांमध्ये क्रूड ऑइल प्रती बॅरल 5 डॉलर पेक्षा स्वस्त 
- देशात पट्रोल-डिझेलचे दर दिवसेंदिवस गगनाला भिडत आसताना दुसरीकडे, आंतरराष्ट्रीय बाजारत क्रूड ऑइलचे दर मात्र खाली-खाली चालेल आहे. असे असतानाही त्याचा फायदा देशवासियांना होताना दिसत नाही. 23 मे रोजी कच्च्या तेलाचे दर 80 डॉलर प्रती बॅरल होते. आता त्यात कपात होऊन 75 डॉलर प्रती बॅरलपर्यंत खाली आले आहेत. सोमवारी डॉलरच्या तुलनेत रुपयाही मजबूत झालेला दिसला. 

 

बातम्या आणखी आहेत...