आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

पेट्रोल 83.33 रूपये लिटर, 55 महिन्यांचा उच्चांक; डिझेल 71 रु. लिटर, आजवरचा उच्चांक

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - सोमवारी औरंगाबादेत पेट्रोलचे दर ८३.३३ रुपये या ५५ महिन्यांच्या उच्चांकावर पोहोचले. दिल्लीत ते ७४.५० रुपये झाले.  तेथे याआधी १४ सप्टेंबर २०१३ ला ७६.०६ रुपये दर होते. डिझेलही ६५.७५ (औरंगाबादेत ७१.०० रु.) या उच्चांकावर पोहोचले. तरीही केंद्र अबकारी शुल्कात कपातीस तयार नाही. ३ वर्षांपूर्वी क्रूडचे दर घटल्यानंतर शुल्क वाढवत पेट्रो. मंत्री धर्मेंद्र प्रधान म्हणाले होते, लोकांवर बोजा वाढल्यानंतर कपात करू. आता मात्र नकार दिला आहे.

 

अबकारी शुल्कात ९ वेळा वाढ
- मे २०१४ मध्ये भारतीय बास्केट क्रूड १०६.८५ डॉलर प्रतिबॅरल. ते जानेवारी २०१६ मध्ये २९.८०८ डॉलरपर्यंत घसरले.

- नोव्हेंबर २०१४ पासून जानेवारी २०१६ दरम्यान पेट्रोल-डिझेलवर ९ वेळा अबकारी शुल्क वाढवले. १५ महिन्यांत पेट्रोलवर शुल्क ११.७७ व व डिझेलवर १३.४७ रुपये वाढले.

- तेव्हा पेट्रोलियम मंत्री म्हणाले होते, क्रूड महाग होईल तेव्हा अबकारी शुल्कात कपात करू - धर्मेंद्र प्रधान

 

क्रूड अडीच पटींनी महागले
- २ वर्षांत क्रूड अडीचपट महाग. सध्या ७३.५ डॉलर. दरम्यान सरकारने अबकारी शुल्कात एकदा कपात केली.

- ऑक्टोबर २०१७ मध्ये पेट्रोल-डिझेलवर शुल्क २-२ रु. ने घटवले होते. केंद्राने राज्यांना व्हॅट कपात सांगितली.  महाराष्ट्र, गुजरात, मध्य प्रदेश व हिमाचल प्रदेशने व्हॅट कपात केली.

 

क्रूड अडीच पटींनी महागले
- २ वर्षांत क्रूड अडीचपट महाग. सध्या ७३.५ डॉलर. दरम्यान सरकारने अबकारी शुल्कात एकदा कपात केली.

- ऑक्टोबर २०१७ मध्ये पेट्रोल-डिझेलवर शुल्क २-२ रु. ने घटवले होते. केंद्राने राज्यांना व्हॅट कपात सांगितली.  महाराष्ट्र, गुजरात, मध्य प्रदेश व हिमाचल प्रदेशने व्हॅट कपात केली.

- आता केंद्र म्हणत आहे की, शुल्क १ रुपयाने घटवले तर १३ हजार काेटी रु.चे नुकसान होईल.

 

पुढील स्‍लाइडवर वाचा, पेट्रोल : ४ वर्षांमध्ये शुल्कात १०५% वाढ...

 

बातम्या आणखी आहेत...