आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • मोठी बातमी: पेट्रोल किमतीत 13व्या दिवशीही कपात, पेट्रोल 21 पैशांनी, तर डिझेल 16 पैशांनी झाले स्वस्त Petrol Diesel Price Cut Down On Thirteen Day

Petrol Price मध्ये 13व्या दिवशीही कपात, पेट्रोल 21 पैशांनी, तर डिझेल 16 पैशांनी झाले स्वस्त

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

13 दिवसांत पेट्रोल 1 रुपया 95 पैसे आणि डिझेल 1 रुपया 45 पैशांनी स्वस्त

दिल्लीमध्ये पेट्रोलचे दर 77च्या खाली, मुंबईत 85 च्या खाली  

 

नवी दिल्ली - पेट्रोलच्या किमतीत 13व्या दिवशीही कपात झाली. सोमवारी पेट्रोल 21 पैशांनी आणि डिझेल 16 पैशांनी स्वस्त झाले. कपातीनंतर दिल्ली, चेन्नई आणि कोलकात्याच्या तुलनेत मुंबईमध्ये पेट्रोल आणि डिझेलच्या किमती अजूनही सर्वात जास्त आहेत. येथे पेट्रोल 84.41 रुपये आणि डिझेल 72.35 रुपये प्रति लिटर आहे. तर, चारही महानगरांच्या तुलनेत दिल्लीमध्ये पेट्रोल आणि डिझेलचे रेट सर्वात कमी आहेत. येथे कपातीनंतर पेट्रोल 76.58 रुपये आणि डिझेल 67.95 रुपये प्रति लिटर आहे. 29 मेपासून आतापर्यंत पेट्रोलवर 1 रुपया 95 पैसे आणि डिझेलवर 1 रुपया 45 पैशांची कपात झाली आहे.

 

पेट्रोल 21 पैशांनी स्वस्त

शहर सोमवारचे दर 10 जूनचे दर किती झाली कपात
दिल्ली 76.58 रुपये 76.78 रुपये 20 पैसे
कोलकाता 79.25 रुपये 79.44 रुपये 19 पैसे
मुंबई 84.41 रुपये 84.61 रुपये 20 पैसे
चेन्नई 79.48 रुपये 79.69 रुपये 21 पैसे

 

डिझेल 16 पैशांनी स्वस्त

शहर सोमवारचे दर 10 जूनचे दर किती झाले कमी
दिल्ली 67.95 रुपये 68.10 रुपये 15 पैसे
कोलकाता 70.50 रुपये 70.65 रुपये 15 पैसे
मुंबई 72.35 रुपये 72.51 रुपये 16 पैसे
चेन्नई 71.73 रुपये 71.89 रुपये 16 पैसे

 

 

 

 

बातम्या आणखी आहेत...