आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

साकेत कोर्टात वरिष्ठ वकिलाने चेंबरमध्ये महिला वकिलाला मारले, दारू पाजली आणि दुष्कर्म केले

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली : साकेत डिस्ट्रिक्ट कोर्टातील चेंबर नंबर 247 मध्ये महिला वकिलाला (32) बळजबरीने दारू पाजून तिच्यासोबत दुष्कर्म याचे प्रकरण समोर आले आहे. वरिष्ठ वकील प्रमोद कुमार लाल (53) यांनी हे दुष्कर्म केले आहे. ही घटना शनिवारी संध्याकाळी 6 ते 7.30 मधली आहे. पीडितेच्या जबाबानुसार पोलिसांनी आरोपीवर बळजबरी दारू पाजून मारहाण आणि दुष्कर्म केल्याचा गुन्हा दाखल करून रात्री अटक केली.


संगम विहार निवासी आरोपीला कोर्टात हजर केल्यानंतर त्याची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली आहे. हिमाचल प्रदेश येथील निवासी पिडीता आपल्या जबाबावरून पलटू नये यासाठी 164 कलमाअंतर्गत तिचा जबाबही नोंदवण्यात आला. या घटनेच्या चौकशीसाठी पोलीस घटनास्थळाच्या जवळपास असलेले सीसीटीव्ही फुटेज तपासत आहे. बार असोसिएशनने आरोपीची वकील सदस्यता निलंबित केली आहे.


पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दुसरा शनिवार असल्यामुळे कोर्टाला सुटी होती. तरीही आरोपीने पीडितेला कॉल करून केस संदर्भात चर्च करायची असल्याचे सांगून चेंबरमध्ये बोलावले. पीडिता संध्याकाळी दुसऱ्या मजल्यावरील चेंबरमध्ये पोहोचली. आरोपी आधीपासूनच चेंबरमध्ये ड्रिंक करत होता. पीडिता चेंबरमध्ये जाताच आरोपीने चेंबर बंद केले आणि केस संदर्भात चर्चा करू लागला. या दरम्यान त्याने पिडीतेचे नाक दाबून बळजबरीने तिच्या तोंडात दारू टाकली. त्यानंतर बळजबरीने तिचे कपडे फाडले. आरडाओरड सुरु झाल्यामुळे त्याने पिडीतेचे तोंड दाबून तिला मारहाण करून दुष्कर्म केले. घटनेनंतर पीडिता नग्न अवस्थेत चेंबर नंबर 264 मधून बाहेर पडली.


चेंबर-264 च्या बाहेर कशी आले, माहित नाही- पीडिता 
कोर्ट परिसरात राहणारे कर्नल सिंह यांची दृष्टी पीडितेवर पडली. त्यांनी वरिष्ठ वकील राकेश सिंह यांना फोन करून सांगितले की, तुमची ज्युनिअर वकील चेंबर नंबर 264 च्या बाहेर नग्न अवस्थेत पडली आहे. त्यानंतर लगेच राकेश सिंह घटनास्थळावर दाखल झाले आणि पीडितेला कपडे घालून घरी घेऊन गेले. तेथून दोघेही एम्स ट्रॉमा सेंटरला गेले. येथे पीडितेने डॉक्टरांना सर्व घटना सांगितली. त्यानंतर हे प्रकरण पोलिसांकडे गेले. पीडितेची मेडिकल तपासणी करण्यात आली आहे. पीडितेने ती चेंबर नंबर 264 च्या बाहेर कशी पोहोचली याविषयी काहीही माहित नसल्याचे सांगितले. पोलीस या प्रकरणाचा पुढील तपस सध्या करत आहेत.

बातम्या आणखी आहेत...