आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Plastic Particulate Matter In 93% Of Bottled Water In The World With Bisleri, Aquafina

बिस्लरी, अॅक्वाफिनासह जगातील 93% बाटलीबंद पाण्‍यात प्लॅस्टिकचे सूक्ष्म कण; बाटलीबंद पाणी अपायकारक

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली- जगभरात बाटलीबंद पाण्याच्या गुणवत्तेबाबत धक्कादायक माहिती बाहेर आली आहे. यानुसार, जगभरात ९० टक्के बाटलीबंद पाण्यात प्लॅस्टिकचे सूक्ष्म कण आढळून आले आहेत. यात जगातील ९ देशांतील ११ मोठ्या ब्रँडस््चा समावेश आहे. यात भारतातील ब्रिस्लरी, अॅक्वाफिना आणि ईव्हियनसारख्या कंपन्यांचाही समावेश आहे.


न्यूयॉर्कच्या स्टेट युनिव्हर्सिटीतील संशोधकांनी या ब्रँडस््च्या २७ लॉटमधून २५९ बाटल्यांची चाचणी घेतली. यासाठी दिल्ली, चेन्नई, मुंबईसह जगातील १९ शहरांतील नमुने गोळा करण्यात आले होते. चाचणीदरम्यान १ लिटर पाण्याच्या बाटलीत १०.४ मायक्रोप्लॅस्टिक अवशेष मिळाले. नळाच्या पाण्याच्या तुलनेत हे प्रमाण दुप्पट आहे.

 

- नळाच्या पाण्याच्या तुलनेत दुप्पट प्लॅस्टिक आढळले
- ९ देशांतील ११ ब्रँडस््च्या २५९ बाटल्यांची चाचणी
- बाटलीबंद पाण्यापेक्षा नळाचे पाणी अधिक सुरक्षित


भारतासह ९ देशांतून नमुने

अहवालानुसार, या चाचणीसाठी भारतासह ९ देशांतून बाटलीबंद पाण्याचे नमुने घेण्यात आले होते. यात भारताव्यतिरिक्त अमेरिका, चीन, ब्राझील, इंडोनेशिया, केनिया, लेबनॉन, मॅक्सिको आणि थायलंड या देशांचा समावेश आहे. यादरम्यान भारतातील ९३ टक्के नमुन्यांत प्लॅस्टिकचे अंश सापडले.


या ब्रँडस््चा होता समावेश

ज्या नमुन्यांत प्लॅस्टिकचा अंश सापडला त्यात भारतातील बिस्लरी आणि अॅक्वाफिना, अॅक्वा, दसानी, एव्हियन, नेस्ले प्युअर लाइफ आणि सान पेलेग्रिनोसारख्या ब्रँडस््चा समावेश आहे.

बातम्या आणखी आहेत...