Home | National | Delhi | PM Modi Promises 150 Percent MSP After Meeting With Farmers Delegation

PM नरेंद्र मोदींचा शेतकऱ्यांना मोठा दिलासा; ऊसाला 150 टक्के हमीभाव देण्याची घोषणा

दिव्य मराठी वेब टीम | Update - Jun 30, 2018, 10:56 AM IST

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शेतकऱ्यांना दीड पट (उत्पादन शुल्काच्या तुलनेत 150%) हमीभाव देणार असल्याचे आश्वस्त केले आहे.

  • PM Modi Promises 150 Percent MSP After Meeting With Farmers Delegation

    नवी दिल्ली - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शेतकऱ्यांना दीड पट (उत्पादन शुल्काच्या तुलनेत 150%) हमीभाव देणार असल्याचे आश्वस्त केले आहे. पीएम मोदींची भेट घेण्यासाठी 5 राज्यांतून 140 ऊस शेतकऱ्यांच्या समूहाने दिल्ली गाठली होती. त्यांची भेट घेतल्यानंतरच मोदींनी हे आश्वासन दिले आहे. त्याची अंमलबजावणी करण्यासाठी लवकरच सरकार अधिकृत मंजुरी देणार अशी घोषणा यावेळी मोदींनी केली. या घोषणेचा खरिप उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.


    > भाजपचा सहकारी पक्ष संयुक्त जनता दलाने सुद्धा शेतकऱ्यांच्या हमीभावाला होणाऱ्या विलंबावर चिंता व्यक्त केली होती. अशात शेतकऱ्यांचा हिताला नुकसान होईल असेही संयुक्त जनता दलाच्या नेत्यांनी म्हटले होते. > त्याच्या दुसऱ्याच दिवशी महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, उत्तराखंड, पंजाब आणि कर्नाटकच्या 140 शेतकऱ्यांनी पंतप्रधानांची भेट घेतली. या भेटीनंतर मोदींनी ही घोषणा केली.
    > सरकारकडून जारी करण्यात आलेल्या माहितीनुसार, "खरिप शेतकऱ्यांना उत्पादन शुल्काच्या तुलनेत 150% हमी भाव देण्याच्या निर्णयाला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी मिळवून दिली जाणार आहे. हे दर 2018-19 च्या खरिप पिकांसाठी लागू होतील. निश्चितच यामुळे शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढेल."
    > 2019 च्या निवडणुकीचे उद्दिष्ट्य आणि शेतकऱ्यांची नाराजी लक्षात घेता ही घोषणा करण्यात आली अशी चर्चा राजकीय वर्तुळात आहे.

Trending