आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मन की बात : \'खेळाडुंनी जगभरात देशाचे नाव मोठे केले, आम्हाला त्या सर्वांचा अभिमान आहे\'

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
'मन की बात'चे प्रसारण रेडिओशिवाय दूरदर्शन, नरेंद्र मोदी अॅपवर होत असते. - फाइल - Divya Marathi
'मन की बात'चे प्रसारण रेडिओशिवाय दूरदर्शन, नरेंद्र मोदी अॅपवर होत असते. - फाइल

नवी दिल्ली -  पंतप्रधान नरेंद्र मोदींनी रविवारी 43व्या 'मन की बात' केली. ऑस्ट्रेलियात झालेल्या राष्ट्रकुल स्पर्धेबाबत बोलताना मोदी म्हणाले, खेळाडुंनी देशवासीयांच्या अपेक्षा पूर्ण करत उत्कृष्ट प्रदर्शन केले. त्यांच्या यसाचा प्रत्येक भारतीयाला अभिमान आहे. यारम्यान पंतप्रधानांनी मनिका बत्रासह अनेक खेळाडुंचे संदेश ऐकवले तसेच सर्वांना शुभेच्छाही दिल्या. लोकांनी फिट इंडिया कार्यक्रमात सहभागी होण्याचे आव्हानही त्यांनी केले. 


लोकांपर्यंत पोहोचवले खेळाडुंचे संदेश... 
- मोदी म्हणाले, नुकत्याच राष्ट्रकुल स्पर्धा झाल्या. भारतासह अनेक देश यात सहभागी झाले होते. यात खेळाडुंचा उत्साह आणि काहीतरी करून दाखवण्याची जिद्द दिसली. भारत किती पदके जिंकणार याचा विचार सर्वच करत होते. 
- भारताने अपेक्षेनुसार कामगिरी करत 26 सुवर्ण पदकांसह 66 पदके जिंकली. खेळाडूच नव्हे संपूर्ण देशासाठी ही अभिमानाची बाब आहे. 
- जेव्हा खेळाडू पदक जिंकल्यानंतर तिरंगा खांद्यावर घेऊन उभे असतात, आणि राष्ट्रगीत वाजत असते तेव्हा प्रत्येकाला अभिमानाची जाणीव होते. 
- मोदींनी यादरम्यान कॉमनवेल्थमध्ये मेडल जिंकणाऱ्या खेळाडुंचे संदेशही ऐकवले. यात टेबल टेनिसमध्ये पदक जिंकणारी मनिका बत्रा म्हणाली, आम्ही खूप सराव केला. त्याचा रिझल्य स्पर्धेत दिसला. 
- तर वेटलिफ्टिंगमध्ये गोल्ड मेडल जिंकणारी मीराबाई चानू म्हणाली, मी देशासाठी पहिले पदक जिंकले याचा मोठा आनंद जाला. मणिपूरच नव्हे संपूर्ण देशाचे नाव मोठे केले. 
- मोदी म्हणाले, यावेळी कॉमनवेल्थ गेम्समध्ये वेटलिफ्टिंग, शूटिंग, बॉक्सिंगमध्ये खेळाडुंची कमाल केली. 
- महिला बॅडमिंटनच्या फायनलमध्ये तर दोन्ही खेळाडू भारताच्या होत्या. कोण जिंकणार हे देशाला पाहायचे होते. सर्वांनी पाहिले आणि मलाही ते पाहून चांगले वाटले. 

 

 

बातम्या आणखी आहेत...