आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • PM Narendra Modi Ranked At Number 3 Among The Top World Leaders By Gallup International Survey

गॅलप सर्व्हे: मोदी जगातील टॉप लीडर्समध्ये तिसऱ्या क्रमांकावर; ट्रम्प मागे, अँजेला मर्केल सर्वात पुढे

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जागतिक नेत्यांच्या यादीत मोदी तिसऱ्या क्रमांकावर. - Divya Marathi
जागतिक नेत्यांच्या यादीत मोदी तिसऱ्या क्रमांकावर.

नवी दिल्ली - पंतप्रधान नरेंद्र मोदी जगातील टॉप लिडर्सच्या यादीत तिसऱ्या क्रमांकवर आहे. गॅलप इंटरनॅशनल सर्व्हेमध्ये याची माहिती देण्यात आली आहे. विशेष म्हणजे मोदींनी चीनेचे प्रेसिडेंट शी जिनपिंग, रशियाचे ब्लादिमीर पुतीन, ब्रिटनेच्या पंतप्रधान थेरेसा मे, अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि इस्त्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांना मागे टाकले आहे. गॅलपच्या या सर्व्हेमध्ये मोदींच्या पुढे दोन नावे आहेत. त्यात जर्मनीच्या चॅन्सलर अँजेला मर्केल आणि फ्रान्सचे प्रेसिडेंट इमानुएल मॅक्रां आहेत. 

 

दावोसा येथे जाणार मोदी 
- मोदी 22 आणि 23 जानेवारी रोजी स्वित्झर्लंड येथील दावोसला जाणार आहेत. येथे ते वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमच्या बैठकीत सहभागी होतील. दावोस भेटीआधी गॅलप सर्व्हेमध्ये मोदी जगातील टॉप लीडर्सच्या यादीत तिसऱ्या क्रमांकावर आले आहेत. 
- या यादीत थेरेसा मे चौथ्या क्रमांकावर तर चीनचे प्रेसिडेंट शी जिनपिंग पाचव्या क्रमांकावर आहेत. पुतीन यांचा क्रमांक सातवा आणि सौदीचे किंग सलमान बिन अब्दुल अजीज आठव्या क्रमांकवर आहेत. सर्वात आश्यर्याची बाब म्हणजे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प या यादीत मोदींपासून आठ पायऱ्या खाली 11व्या क्रमांकावर आहेत. 

 

गॅलपचे अध्यक्ष काय म्हणाले...

- गॅलप इंटरनॅशनल असोसिएशनचे अध्यक्ष केंचो स्टोईचेव्ह म्हणाले, 'अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प लोकांमध्ये दुही निर्माण करत आहेत. त्यामुळे स्पष्ट आहे की जग आता सर्वोच्च नेतेपदी दुसऱ्या नेत्याला पाहात आहे.'
- केंचो पुढे म्हणाले, की 'पुतिन पुढे आले आहेत. मात्र त्यांना लोकांमध्ये विश्वास निर्माण करावा लागणार आहे. त्यासाठी त्यांना अजून काम करण्याची गरज आहे. मात्र तरीही दुसरी बाजू ही देखील आहे की या यादीत प्रथमच रशियाचा नेता अर्थात पुतीन हे अमेरिकेच्या एखाद्या नेत्याच्या पुढे गेले आहेत.'

 

कसा झाला सर्व्हे ? 
- गॅलपचा सर्व्हे 1977 पासून सुरु आहे. यावेळी सर्व्हे मध्ये 50 देशांच्या 53769 लोकांनी सहभाग नोंदवला होता. 

बातम्या आणखी आहेत...