आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मोदी 6 महिन्यांत घेणार 50 सभा, निवडणुकांपूर्वी भाजपचे 4 नेते कव्हर करणार 400 जागा

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - 2019 च्या लोकसभा निवडणउकांच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी आगामी 6 महिन्यांत देशभरात 50 सभा घेणार आहेत. त्यामाद्यमातून 100 हून अधिक लोकसभा मतदारसंघ कव्हर करण्याचा त्यांचा विचार आहे. मोदींशिवाय फेब्रुवारी 2019 पर्यंत भाजपाध्यक्ष अमित शहा, केंद्रीय मंत्री राजनाथ सिंह आणि नितिन गडकरीही 50-50 सभा गेणार आहेत. 


न्यूज एजन्सीच्या वृत्तानुसार भाजपच्या एका वरिष्ठ नेत्याने सांगितले की, या सभा पक्षाच्या निवडणूक प्रचाराचा शुभारंभ म्हणून घेतल्या जातील. या माध्यमातून कार्यकर्ते आणि नेत्यांना निवडणुकीच्या मूडमध्ये आणणे हा उद्देश आहे. एका रॅलीतून 2 ते 3 लोकसभा मतदारसंघ कव्हर करण्याची योजना आखण्यात आली आहे. सार्वत्रिक निवडणुकांच्या पूर्वी मोदी, शाह, राजनाथ आणि गडकरी 200 सभांमधून देशभरातील 400 लोकसभा मतदारसंघ कव्हर करतील. 

 

पंजाबधून सुरुवात 
पक्षातील सुत्रांच्या मते मोदी या सर्व सभांच्या शिवाय राजस्थान, मध्यप्रदेश आणि छत्तीसगडमधील विधानसभा निवडणुकीसाठीही प्रचार सभा घेतील. या अभियानाची सुरुवात पंजाबमधून झाली आहे. मोदींनी 11 जुलैला येथील मलोटमध्ये सभा घेत निवडणुकीचा बिगुल वाजवला होता. याच महिन्यात ते उत्तरप्रदेशातही सभा घेणार आहेत. 

बातम्या आणखी आहेत...