आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पीएनबी : 11,356 कोटींचा घोटाळा; बँक अधिकाऱ्यांनी चुकीच्या पद्धतीने दिले एलओयू

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

 नवी दिल्ली- पंजाब नॅशनल बँकेत देशाच्या बँकिंग क्षेत्रातील दुसरा सर्वात मोठा घोटाळा झाला आहे. मुंबईतील ब्रेडी हाऊस शाखेतील ही फसवणूक १७७.१७ कोटी डॉलर म्हणजे तब्बल ११,३५६ कोटी रुपयांची आहे. या प्रकरणात हिरे व्यापारी नीरव मोदी याच्याविरुद्ध सीबीआयकडे दोन तक्रारी दाखल झाल्या आहेत. बँकेच्या तक्रारीवरून ईडीनेही गुन्हा दाखल केला आहे.  पीएनबीने बुधवारी स्टॉक एक्स्चेंजला दिलेल्या माहितीत म्हटले अाहे की, बँकेच्या या शाखेतील काही खात्यांत चुकीचे व्यवहार समोर आले. त्याच्या आधारे इतर बँकांनी खातेदारांना परदेशात कर्जे दिली अाहेत. 


अर्थ मंत्रालयाच्या सूत्रांनुसार, हा गैरव्यवहार २०११ पासून सुरू होता. त्यात डीएजीएम स्तरापर्यंतच्या अधिकाऱ्यांचा समावेश होता. बँकेने १० कर्मचारी निलंबित केले आहे. मंत्रालयाने प्रकरणातील सर्व बँकांकडून ३ दिवसांत अहवाल मागवला आहे. याआधी २०१५ मध्ये बँक ऑफ बडोदाच्या दिल्लीतील एका शाखेत ६ हजार कोटींचा घोटाळा समोर आला होता. 


सूत्रांनुसार, नीरव मोदी व संबंधित कंपन्यांसाठी ५ लेटर ऑफ अंडरस्टँडिंग अलाहाबाद बँक आणि ३ एलओयू अॅक्सिस बँकेच्या हाँगकाँग शाखेच्या नावाने जारी झाले होते. अशा प्रकरणांत अंतिम देणी एलओयू देणाऱ्या बँकेची असते.

 

वार्षिक नफ्याच्या ८ पट मोठा घोटाळा
घोटाळ्याची रक्कम २०१६-१७ मध्ये बँकेच्या १,३२५ कोटी नफ्याच्या तुलनेत ८ पट जास्त आहे. ती बँकेच्या ३५,३६५ कोटींच्या मार्केट कॅपची एक तृतीयांश आणि ४.५ लाख कोटींच्या एकूण कर्जाची २.५% भरते.

बातम्या आणखी आहेत...