आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Pnb Fraud Arvind Kejriwal Congress Opposition Allegations Tweets News And Updates

\'PM मोदींची गळाभेट घ्या, 12 हजार Cr. घेऊन जा\', PNB घोटाळ्यावर राहुल गांधींची बोचरी टीका

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - पंजाब नॅशनल बँकेमधील 11,356 कोटींचा घोटाळा समोर आल्यानंतर विरोधीपक्षांनी मोदी सरकारवर हल्लाबोल सुरु केला आहे. अरविंद केजरीवाल यांनी भाजप सरकारवर आरोप केला आहे की, 'भाजप आणि मोदी सरकारसोबत मिलीभगत असल्याशिवाय विजय माल्या आणि नीरव मोदी भारताबाहेर जाऊ शकतात का?' काँग्रेसने या प्रकरणावर 4 प्रश्न उपस्थित केले आहेत. नीरव मोदी भारताबाहेर गेले आहेत का? असा काँग्रेसचा सवाल आहे. काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी ट्विट करुन सरकारवर हल्ला केला आहे. पंतप्रधान मोदींची गळाभेट घ्या आणि 12 हजार कोटी घेऊन जा, असे ट्विट काँग्रेस अध्यक्षांनी केली आहे. 

 

 

- बँकेने घोटाळा प्रकरणी नीरव, त्यांची पत्नी, भाऊ आणि बिझनेस पार्टनर यांच्याविरोधात सीबीआयकडे दोन तक्रारी केल्या आहेत. सीबीआयच्या एफआयआरच्या आधारावर इन्फोर्समेंट डायरेक्टोरेट (ईडी) नेही मनी लाँड्रिंगची केस दाखल केली आहे. 

 

काँग्रेसचे ४ प्रश्न
- नीरव मोदीने बनावट एलओयूच्या माध्यमातून बँकिंग प्रणालीशी खेळ केला. याला जबाबदार कोण?
- २६ जुलै २०१६ रोजी तक्रार केल्यावर पीएमनी कारवाई का नाही केली? वित्त मंत्रालय, आर्थिक गुप्तचर विभाग, इतर विभाग काय करत होते?
- २९ जानेवारी २०१८ रोजी पीएनबीने सीबीआयला पत्र लिहून नीरव मोदीविरुद्ध लूकआऊट नोटीस काढण्याचा आग्रह केला होता. तरीही नीरव पळण्यात यशस्वी कसा झाला? 
- सर्व ऑडिटर्स आणि तपास करणारे यांच्या नजरेतून घोटाळा कसा सुटला?


भाजपचे उत्तर
घोटाळा तर यूपीएच्या काळात झाला. त्यांनी दबाव वाढवला होता. आमचे सरकार तर घोटाळा उघड करत आहे. 
-निर्मला सीतारमण

 

इतर बँक अधिकाऱ्यांवरही संशय : पीएनबी
पीएनबीने ३० बँकांना पत्र पाठवले आहे. यात म्हटले आहे की, एलओयूमध्ये पीएनबीने आयातीनंतर एक वर्षात कर्ज फेडावे लागेल, असे नमूद केले होते. याकडे दुर्लक्ष झाले. कदाचित इतर बँकांचे अधिकारी पण या घोटाळ्यात सहभागी असू शकतात.
- इतर बँकांचे म्हणणे आहे की, पीएनबी ही रक्कम परत देण्यात विलंब करेल, अशी बँकांना शंका आहे. त्यामुळे अर्थ मंत्रालयाने हस्तक्षेप करावा.

 

दावोसमध्ये पंतप्रधान मोदींसोबत नीरव मोदी 

- पंजाब नॅशनल बँकेत झालेल्या 11,356 कोटींच्या घोटाळ्यानंतर हिरा व्यापारी नीरव मोदीबद्दलची रंजक माहिती समोर येऊ लागली आहे. बँकेने नीरव मोदीसह काही जणांविरोधात 4.4 कोटी डॉलर घोटाळा प्रकरणी तक्रार दाखल केली आहे. ही तक्रार दाखल करण्याच्या अवघ्या आठ दिवसआधी नीरव मोदी पंतप्रधान नरेंद्र मोदींसोबत दिसला होता. 

- पंतप्रधान नरेंद्र मोदी जानेवारीमध्ये दावोस येथील आर्थिक परिषदेसाठी गेले होते. पंतप्रधानांच्या शिष्टमंडळात नीरव मोदीचाही समावेश असल्याचे म्हटले जात आहे. मार्क्सवादी कम्यूनिस्ट पक्षाचे नेते सीताराम येचुरी यांनी 23 जानेवारी रोजी मोदींचा शिष्टमंडळासोबतचा फोटो ट्विटरवर शेअर केला आहे. नीरव मोदींने दावोसच्या परिषदेला हजेरी लावण्याची ही काही पहिली वेळ नव्हती. याआधी 2016 मध्ये अर्थमंत्री अरुण जेटली यांच्यासोबतही नीरव मोदी होता. 

- 31 जानेवारी रोजी नीरव मोदीविरोधात तक्रार दाखल झाली. त्याच्या एक आठवडा आधी तो भारतातून फरार झाल्याची सूत्रांची माहिती आहे. 

 

एमडी म्हणाले- बँकेचे ग्राहक आमच्यासाठी महत्त्वाचे 

- पंजाब नॅशनल बँकेत झालेल्या 11,356 कोटींच्या घोटाळ्यावर बँकेने स्पष्टीकरण दिले आहे. बँकेचे व्यवस्थापकिय संचालक (एमडी) सुनील मेहता म्हणाले, नीरव मोदी पैसे परत करणार होता. परंतू त्याचा प्लॅन परिपूर्ण नव्हता. मेहता म्हणाले, 'आमची 123 वर्षे जुनी संस्था (बँक) आहे. दोषींना पकडण्यासाठी आम्ही पूर्ण ताकदीने लढू आणि त्यांच्याविरोधात कडक कारवाई करु. '

- बँकेचे ग्राहक हे आमच्यासाठी सर्वाधिक महत्त्वाचे असल्याचे ते म्हणाले. 
- पीएनबीमधील घोटाळ्याला कँसर संबोधत हा रोग समूळ नष्ट करण्याचे प्रयत्न सुरु असल्याचे त्यांनी सांगितले. यामध्ये जे-जे लोक दोषी असतील त्यांच्यावर कारवाई सुरु असल्याचेही त्यांनी सांगितले. 

- हा घोटाळा 2011 पासून सुरु असल्याचे कळाल्याचे एमडी मेहता यांनी सांगितले. अर्थ मंत्रालयाच्या सूत्रांनीही हिच माहिती दिली आहे. 

- घोटाळ्यात डीएजीएम स्तरापर्यंतच्या अधिकाऱ्यांचा समावेश असल्याची सूत्रांची माहिती आहे. 

- मेहता म्हणाले, बँकेने 10 कर्मचारी निलंबति केले आहेत. हा कँसर संपवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जात आहेत.

 

असा झाला घोटाळा 
> पीएनबीमधील काही अधिकाऱ्यांनी सांगितले की नीरव मोदी यांना चुकीच्या पद्धतीने 5 लेटर ऑफ अंडरटेकिंग (एलओयू) देण्यात आले. या एलओयूच्या आधारावर मोदी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी दुसऱ्या बँकांकडून विदेशात कर्ज घेतले. 
> लेटर ऑफ अंडरटेकिंग (एलओयू) ही एक प्रकारची बँक गॅरंटी असते. याच्या आधारावर विदेशी बँक किंवा भारतीय बँकेची विदेशातील शाखा कर्ज देत असते. 
> पीएनबीने कोणत्याही बँकेचे नाव घेतलेले नाही. मात्र सूत्रांच्या माहितीनुसार, यूनियन बँक ऑफ इंडिया, अलाहाबाद बँक आणि अॅक्सिस बँकेने पीएनबीच्या एलओयूच्या आधारावर नीरव आणि त्यांच्याशी संबंधीत कंपन्यांना कर्ज दिले आहे.
 
एक्सपर्ट्स काय म्हणतात  
> बँकिंग क्षेत्रातील एक्सपर्ट्सचे म्हणणे आहे की अशा प्रकरणात शेवटी एलओयू देणाऱ्या बँकेला देणे चुकवावे लागते. 

 

कोण आहे नीरव मोदी?
> नीरव मोदी गुजरातचा एक हिरे व्यापारी आहे. त्याचा जन्म हिरे व्यापाराची जागितक राजधानी समजल्या जाणाऱ्या एंटवर्प (बेल्जियम) येथे झाला. 
> मोदीच्या डायमंड ब्रँडचे नाव 'नीरव मोदी' हेच आहे. देश-विदेशात त्याच्या अनेक शो-रुम्स आहेत. 
> नीरव मोदीचे एकूण संपत्ती 11,500 कोटी रुपये आहे. 
> त्याची ज्वेलरी केट विन्सलेट, ताराजी हेन्सन, कार्ली क्लॉस, आणि वायोला डेव्हिस सारख्या इंटरनॅशनल सेलिब्रिटी वापरात. प्रियंका चोप्रा, अनुष्का शर्मा यांसारख्या भारतीय अभिनेत्री आणि मॉडेल्सने ऑस्करसारख्या सोहळ्यांमध्ये त्याच्या ब्रँडची ज्वेलरी परिधान केलेली आहे.