आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

PNB घोटाळ्यात CBI ने दाखल केले दुसरे आरोपपत्र, मेहुल चौकसीच्या भूमिकेचा उल्लेख

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पीएनबी घोटाळ्यात सीबीआयने दुसरे आरोपपत्र दाखल केले. त्यात मेहुल चौकसीचे नाव प्रामुख्याने घेण्यात आले आहे. - Divya Marathi
पीएनबी घोटाळ्यात सीबीआयने दुसरे आरोपपत्र दाखल केले. त्यात मेहुल चौकसीचे नाव प्रामुख्याने घेण्यात आले आहे.

नवी दिल्ली - पंजाब नॅशनल बँकेत 13,000 कोटी रुपयांच्या सर्वात मोठ्या बँकिंग घोटाळ्यात सीबीआयने बुधवारी दुसरे आरोपपत्र दाखल केले आहे. सीबीआयने तीन दिवसांत दुसरे आरोपपत्र दाखल केले आहे. यामध्ये मुख्य आरोपी नीरव मोदीचा मामा मेहुल चौकसीसह 17 जणांविरोधात आरोपपत्र दाखल केले आहे. यामध्ये गीतांजली ग्रुपशी संबंधीत कंपन्यासह दुसऱ्या कंपन्या आणि लोकांची नावे यामध्ये आहेत. गुन्हेगारी षडयंत्र, धोकेबाजी, भ्रष्टाचार प्रतिबंधक कायदा या अंतर्गत मुंबईतील विशेष कोर्टात चार्जशीट दाखल केली आहे. सोमवारी दाखल केलेल्या आरोपपत्रात मेहुल चौकसीचे नाव नव्हते. त्यामुळे सीबीआयच्या भूमिकेवर विरोधकांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. 

 

सोमवारी दाखल झाले पहिले आरोपपत्र 
- देशातील सर्वात मोठ्या बँकिंग घोटाळ्यात सीबीआयने सोमवारी पहिले आरोपपत्र दाखल केले. यामध्ये पीएनबीच्या माजी प्रमुख आणि अलाहाबाद बँकेच्या सध्याच्या एमडी तसेच सीईओ उषा अनंतसुब्रमण्यम आणि पीएनबीचे दोन कार्यकारी संचालक (ईडी) सह 22 लोकांची नावे आहेत. त्यानंतर अर्थ मंत्रालयाने तत्काळ अलाहाबाद बँकेच्या उषा अनंतसुब्रमण्यम यांचे सर्व अधिकार गोठवले असून त्यांच्याविरोधात कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत. सरकारच्या निर्देशांनंतरच पीएनबीनेही दोघांचे अधिकार गोठवले आहेत.
- पीएनबीमध्ये सरकारची 62 टक्के आणि अलाहाबाद बँकेमध्ये 65 टक्के भागीदारी आहे. 
- हिरे व्यापारी नीरव मोदी आणि त्याचा मामा मेहुल चौकसी यांनी बनावट “लेटर ऑफ अंडरटेकिंग’ (एलओयू) च्या माध्यमातून पीएनबीला 13,000 कोटी रुपयांचा गंडा घातला होता. हे एलओयू डायमंड आर युज, सोलार एक्सपोर्ट्स आणि स्टेलर डायमंड्सला देण्यात आले होते.

 

बातम्या आणखी आहेत...