आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पीएनबी घोटाळा: फरार नीरव मोदी, मेहुलचा पासपोर्ट चार आठवड्यांसाठी केला निलंबित

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
ईडीने गुरुवारी नीरव मोदीच्या 17 ठिकाणांवर छापेमारी केली. - Divya Marathi
ईडीने गुरुवारी नीरव मोदीच्या 17 ठिकाणांवर छापेमारी केली.

नवी दिल्ली- देशातील सर्वात मोठा ११,३९४ कोटी रुपयांचा बँक घोटाळा करणारा हिरे व्यापारी नीरव मोदी आणि त्याचा मामा मेहुल चौकसी यांचे पासपोर्ट परराष्ट्र मंत्रालयाने चार आठवड्यांसाठी निलंबित केले आहेत. यावर एका आठवड्यात उत्तर दिले नाही तर दोघांचे पासपोर्ट रद्द केले जातील. माध्यमांनुसार, नीरव मोदी सध्या न्यूयॉर्कमध्ये एका लक्झरी हॉटेलमध्ये थांबला आहे. मात्र, परराष्ट्र मंत्रालयास याबाबत काही माहिती नाही.


परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रवीश कुमार म्हणाले, ‘नीरव कुठे आहे हे माहिती नाही. मात्र, तो ज्या कोणत्या देशात असेल तेथून पळून जाऊ शकणार नाही.’ दरम्यान, सीबीआयने नीरव व त्याच्या कुटुंबीयांचा ठावठिकाणा शोधण्यासाठी इंटरपोलला पत्र पाठवले आहे.


दुसरीकडे मेहुल चौकसी यानेही याच घोटाळ्यात पीएनबीला ४,८८६ कोटी रुपयांना गंडवल्याचे समोर आले आहे. १३ फेब्रुवारी रोजीच बँकेने त्याच्या गीतांजली ग्रुपविरुद्ध तक्रार दिली होती. यावरून शुक्रवारी सीबीआयने नवा गुन्हा दाखल केला. पीएनबीने अातापर्यंत तीन तक्रारी दाखल केल्या असून ही बँक एकावेळी तक्रारी दाखल न करता वेगवेगळ्या का करत आहेत, याची सीबीआय चौकशी करत आहे. तपास संस्थेने शुक्रवारी मुंबई, पुणे, सुरत, जयपूर, हैदराबाद आणि कोइम्बतूरमध्ये २६ ठिकाणी छापे टाकले.

 

यूपीएच्या काळापासूनच

अलाहाबाद बँकेचे माजी संचालक दिनेश दुबे यांनी दावा केला आहे की हा घोटाळा यूपीए सरकारच्या काळापासूनच सुरू आहे. एनडीए सरकारच्या काळात तो वाढला. गीतांजली जेम्सला चुकीच्या पद्धतीने कर्ज दिले गेल्याप्रकरणी आक्षेप घेतल्यानंतर आपल्याला राजीनामा द्यावा लागला होता, असे दुबे यांचे म्हणणे आहे.

 

ईडीने ५४९ कोटींचे दागिने केले जप्त

सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) नीरव व मेहुल यांना मनी लाँडरिंग कायद्यानुसार समन्स बजावले आहे. दोघांनाही आठवडाभरात उपस्थित राहण्यास सांगण्यात आले आहे. कंपन्यांच्या संचालकांनाही अशा नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. गुरुवारी ईडीने छापासत्रात ५,१०० कोटी रुपयांचे हिरे, सोने आणि दागिने जप्त केले होते. मुंबईतील तीन मालमत्ताही सील केल्या होत्या. शुक्रवारीही ५४९ कोटींचे दागिने जप्त करण्यात आले.

 

 

पीएनबीचे ५ अधिकारी निलंबित

पीएनबीने एका जनरल मॅनेजरसह आणखी ८ अधिकाऱ्यांना निलंबित केले. बुधवारी १० कर्मचाऱ्यांना  निलंबित करण्यात आले आहे. दरम्यान, या प्रकरणात इतर बँकांना ३१ मार्चपर्यंत पैसे दिले जातील, असे पीएनबीच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.

 

हेही वाचा... 

> PNB महाघोटाळा: गुजरातमध्ये पापड विकत होते नीरव मोदीचे कुटुंब, आता 10 देशात हिऱ्यांचा व्यापार

पीएनबी भारतीयांच्या पैशातून कामाला सुरुवात करणारी देशातील पहिली बँक; लालाजींचा पुढाकार

'PM मोदींची गळाभेट घ्या, 12 हजार Cr. घेऊन जा', PNB घोटाळ्यावर राहुल गांधींची बोचरी टीका

तपासामध्ये आमच्यावर जबाबदारी निश्चित झाली तर नक्कीच पैसे परत करू : पीएनबी

 

बातम्या आणखी आहेत...