आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

PNB फ्रॉड: नीरव मोदी-मेहुल चौकसीच्या संपत्ती विक्रीवर कंपनी लॉ ट्रिब्यूनलने घातली बंदी

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - पंजाब नॅशनल बँकेला 12,672 कोटींचा चुना लावणारा हिरे व्यापारी नीरव मोदी आणि त्याचा मामा मेहुल चौकसी यांची चहुबाजूने कोंडी होताना दिसत आहे. या दोघांशी संबंधीत व्यक्ती आणि कंपन्या या त्यांची संपत्तीची विक्री करु शकणार नाही, असे आदेश नॅशनल कंपनी लॉ ट्रिब्यूनलने (एनसीएलटी)  दिले आहे. नीरव आणि मेहुल यांच्यांशी संबंधीत 64 व्यक्ती आणि कंपन्यांवर संपत्ती विक्री बंदी लादण्यात आली आहे. यात नीरव मोदीची कंपनी फायरस्टार डायमंड, मेहुलची गीतांजली जेम्स गिली इंडिया, नक्षत्र, आणि पंजाब नॅशनल बँकेच्या कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. 

 

तत्काळ सुनावणीची केली होती मागणी 
- कंपनी व्यवहार मंत्रालयाने एनसीएलटीच्या मुंबई खंडपीठासमोर 23 फेब्रुवारीला याचिका दाखल केली होती. त्यात कंपनी मंत्रालयाने तत्काळ सुनावणीची मागणी केली होती. 
- ट्रिब्यूनलने 26 मार्चला पुढील सुनावणी पर्यंत ही बंदी लादली आहे. त्यासोबतच या सर्व 64 व्यक्तींना कोर्टात हजर राहाण्यास सांगितले आहे. 
- सीरियस फ्रॉड इन्व्हेस्टीगेटी ऑन ऑफिस (एसएफआयओ) हे नीरव मोदी आणि मेहुल चौकसी यांच्याशी संबंधीत 110 कंपन्या आणि 10 एलएलपी फर्म यांची चौकशी करत आहेत. 

 

नीरव आणि मेहुलबद्दल मॉरिशस सरकारने माहिती मागवली 
- नीरव मोदी आणि मेहुल चौकसी यांच्या घोटाळ्याने मॉरिशस सरकारही चौकशी करत आहे. या दोघांशी संबंधीत व्यक्ती आणि कंपन्यांवर मॉरिशस सरकारने कारवाईचे आश्वासन दिले आहे. 
- तेथील रेग्यूलेटर फायनेंशियल सर्व्हिसेज कमिशनने एक निवेदन प्रसिद्ध केले आहे. त्यात म्हटले आहे की नीरव आणि मेहुल संदर्भात मीडियात येत असलेल्या बातम्यांवरुन कारवाई करण्यात येत आहे. त्यासोबतच भारतीय तपास यंत्रणांकडूनही या घोटाळ्यातील व्यक्तींची माहिती घेतली जात आहे. 

बातम्या आणखी आहेत...