आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • PNB Fraud Nirav Modi Mehul Choksi Diamonds Jewellery Auction Not Soon News And Updates

PNB : नीरवच्या 9 कार आणि गीतांजलीचे 86 कोटींचे शेअर्स आणि म्युच्युअल फंड जप्त

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - एन्फोर्समेंट डायरेक्टरेट (ईडी) आणि सीबीआईची कारवाई सलग आठव्या दिवशीही सुरू आहे. पीएनबी घोटाळ्यामध्ये गुरुवारी नीरव मोदीच्या मुंबईतील फॉर्महाऊसवर छापाही टाकण्यात आला. त्याशिवाय नीरवच्या 9 लक्झरी कारसह 7.80 कोटींचे म्युच्युअल फंड आणि शेयरही जप्त करण्यात आले. दुसरीकडे मेहुल चौकसीच्या गीतांजली ग्रुपच्या 86.72 कोटींचे म्युच्युअल फंड आणि शेयरही तपास संस्थेने ताब्यात घेतले. तर ईडीने गिली इंडिया कंपनीचे डायरेक्टर अनियथ शिवरामनयांचे मुंबईतील घर सील केले आहे. 


ईडीने नीरव मोदींच्या ९ कार जप्त केल्या 
- एन्फोर्समेंट डायरेक्टोरेटने नीरव मोदींच्या 9 लक्झरी कार जप्त केल्या. त्यात रोल्स रॉयस घोस्ट, पोर्श पॅनामरा, मर्सिडीज, बीएमडब्ल्यू फॉर्च्युनर, 3 होंडा सिटी कार,1 इनोवा कार. 


5649 चे दागिने जप्त 
- पंजाबच्या नॅशनल बँक (पीएनबी) ला 11,356 कोटींचा चुना लावणाऱ्या नीरवच्या विविध शॉप आणि इतर ठिकाणांहून ईडीने 5649 कोटींचे दागिने जप्त केले आहेत. 
- तज्ज्ञांच्या मते अद्याप पीएनबीला हेही माहिती नाही की, मेहुल चौकसी आणि नीरव मोदीवर एकूण किती कर्ज आहे. 


निर्णयापूर्वी लिलाव किंवा विक्री अशक्य 
अॅडव्होकेट सुबोध कुमार पाठक यांनी सांगितले की, ईडीची कारवाई प्रिव्हेंशन ऑफ मनी लॉडरिंग अॅक्ट (पीएमएलए) अंतर्गत होतेय. हे गुन्हेगारी  प्रकरण आहे. आरोपीने चुकीच्या पद्धतीने पैसा किंवा संपत्ती जमवली असेल तर ती जप्त केली जाऊ शकते. पण जोवर खटल्याबाबत निर्णय होत नाही, तोपर्यंत त्याची विक्री किंवा लिलाव केला जाऊ शकत नाही. जर जप्त केलेले हिरे आणि दागिने यावर एखादा सप्लायर पुराव्यांच्या आधारे दावा करत असेल तर आणि त्याने नीरव मोदीला हे दागिने विक्रीसाठी दिले होते, असे म्हणत असेल तर हे प्रकरण अधिक गुंतागुंतीचे होईल. त्या व्यक्तीचा दावा खरा ठरला तर त्याला हे दागिने द्यावे लागू शकतात. 


60 दिवसांत पैसे चुकवले नाही तर लिलाव 
अद्याप हे स्पष्ट नाही की, नीरव मोदीने जे कर्ज घेतले त्याबदल्यात त्याने काय गहाण ठेवले. जंगम मालमत्तेमध्ये स्टॉक, बूक ऑफ बॅलेन्स शीट यांचा समावेश आहे. जर मोदींनी स्टॉक मॉर्गेज केले असेल तर सरफेसी अॅक्ट अंतर्गत लिलाव सहजपणे होऊ शकतो. पण तसे झाले नाही तर संपल्यानंतर लिलाव होईल. त्याअंतर्गत सरकार कर्ज परत करण्यासाठी नोटिस देते. कायद्यानुसार 60 दिवसांत परतफेड झाली नाही तर, मॉर्गेज प्रॉपर्टीचा लिलाव केला जाऊ शकतो. 


फ्रँचायसी आणि सप्लायरही करू शकतात दावा 
- हिऱ्यांच्या दागिन्यांच्या व्यावसायिकांनी सांगितले की, ज्या 5600 कोटींच्या मालाची जप्ती दाखवली आहे, ते फ्रँचायसी घेतलेल्या स्टोअर्सचेही अशू शकतात. 
- फ्रँचायसी माल घेण्याच्या आधीच पेमेंट करतात. असे असल्यास फ्रँचायसीला माल परत करावा लागू शकतो. 

 

 

बातम्या आणखी आहेत...