आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पीएनबी घाेटाळा 12,717 कोटींवर, बँकेने स्टॉक एक्स्चेंजला माहिती

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली- नीरव मोदी-मेहुल चोकसीने पंजाब नॅशनल बँकेला आणखी १,३२३ कोटींनी फसवल्याचे समोर आले आहे. आता घोटाळ्याची एकूण रक्कम १२,७१७ कोटी रुपयांवर गेली आहे. बँकेने सोमवारी रात्री ११.२२ वाजता स्टॉक एक्स्चेंजला ही माहिती दिली. त्यानुसार, अनधिकृत व्यवहारांचा आकडा वाढून २०.४२ कोटी डॉलर्सवर जाऊ शकतो. याआधी बँकेने १७.७ कोटी डाॅलर्सच्या घोटाळ्याची माहिती दिली होती. सीबीआयने सोमवारी प्रकरणात पीएनबीच्या कार्यकारी संचालकांची चौकशी केली होती.  


बँकेने काय सांगितले?
- न्यूज एजन्सीच्या माहितीनुसार पीएनबीने सोमवारी बॉम्बे स्टॉक एक्सचेंज (BSE) ला लेखीमध्ये अशी माहिती दिली की, 13000 कोटींपेक्षा अधिकचे व्यवहार चुकीच्या पद्धतीने करण्यात आले. 
- बँकेने सांगितले की, या बेकायदेशीर व्यवहारांची रक्कम वाढून 204.25 मिलियन डॉलरपेक्षा अधिक असू शकते. सध्याच्या एक्सचेंज रेटनुसार ही रक्कम 13235 कोटींच्या आसपास होते. 
- बँकेने 14 फेब्रुवारीला सर्वात आधी हे सांगितले होते की, 1.77 बिलियन डॉलर (सुमारे 11,400 कोटी) चे व्यवहार झाले. 


आतापर्यंत 12 जणांना अटक 
- या प्रकरणात आतापर्यंत 12 जणांना अटक करण्यात आले आहे. 
- सीबीआयने 17 फेब्रुवारीला सर्वप्रथम तीन जणांना अटक केली होती. त्यात 2 बँक कर्मचारी- डेप्युटी मॅनेजर गोकुलनाथ शेट्टी आणि ऑथराइज्ड सिग्नेटरी मनोज खरात आणि नीरव मोदी यांच्या कंपनीचे ऑथराइज्ड सिग्नेटरी हेमंत भट यांचा समावेश होता. 
- 19 फेब्रुवारीला बँकेच्या फॉरेन एक्सचेंज डिपार्टमेंटचे चिफ मॅनेजर बच्चू तिवारी, मॅनेजर यशवंत जोशी आणि एक बँक अधिकारी प्रफुल्ल सावंत म्हणजे 3 जणांना अटक केले होते. 
- 20 फेब्रुवारीला सीबीआयने 5 झणांना अटक केली. त्यात फायरस्टारचे प्रेसिडेंट (फायनान्स) विपुल अंबानी, सिनियर एक्झिक्युटिव्ह अर्जुन पाटील, असिस्टंट एक्झिक्युटिव्ह कविता मनकिकर, नक्षत्रचे चीफ फायनांशिअल ऑफिसर कपिल खंडेलवाल आणि मॅनेजर नितेन शाही यांचा समावेश होता. विपुल मुकेश अंबानी यांचा चुलत भाऊ आहे. 
- 20 फेब्रुवारीलाच सीबीआयने दिवसभर पीएनबीचे एक एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरसह 10 आणि नीरव-मेहूल यांच्या कंपन्यांच्या 8 अधिकाऱ्यांची चौकशी केली होती. नीरव यांच्या अलिबाग स्थित फार्म हाऊसवरही छापा मारण्यात आला. 
- त्यानंतर रात्री उशीरा जनरल मॅनेजर रँकचे अधिकारी राजेश जिंदल यांना अटक करण्यात आली. 


आतापर्यंतची कारवाई 
- पीएनबी घोटाळा उघड झाल्यानंतर ईडीने संपूर्ण देशातील गीतांजली ज्वेलर्सच्या 38 शोरूम्सवर छापा टाकला होता. यादरम्यान देशभरातून 22 कोटींचे दागिने जप्त करण्यात आले. 
- रायपूरमध्ये सुमारे 1.77 कोटी रुपयांची ज्वेलरी जप्त करण्यात आली. ईडीच्या रायपूर टीमने मुंबई हेडक्वार्टरमध्ये पाठवलेल्या व्हिजिट कम सीजर रिपोर्टमध्ये त्याची विस्तृत माहिती दिली. सोबतच जप्त करण्यात आलेले हिरे लॅबमध्ये तयार केलेले (नकली) असल्याचे संकेत मिळाले. 
- जप्त करण्यात आलेल्या दागिन्यांच्या लॅब टेस्टसह त्याचे व्हॅल्युएशनही केले जाण्याची शक्यता आहे. 


काय आहे पीएनबी घोटाळा?
- पंजाब नॅशनल बँकेने सेबी आणि बॉम्बे स्टॉक एक्सचेंजला 11,356 कोटींच्या घोटाळ्याची माहिती दिली होती. मुंबईच्या ब्रेडी हाऊस ब्रँचमध्ये हा घोटाळा करण्यात आला. या घोटाळ्याची सुरुवात 2011 पासून झाली होती. 7 वर्षांमध्ये हजारो कोटींची रक्कम बनावट लेटर ऑफ अंडरटेकिंग (LoUs) द्वारे परदेशी अकाऊंट्समध्ये ट्रान्सफर करण्यात आली. 
- मुख्य आरोप हिरे व्यावसायिक नीरव मोदी आणि गीतांजली ग्रुप्सचे मालक मेहूल चौकसी आहेत. या दोघांनी बँकेचे डेप्युटी मॅनेजर गोकुलनाथ शेट्टी यांच्या मदतीने या घोटाळा केला. 

 

 

बातम्या आणखी आहेत...