आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गीतांजली जेम्सच्या माजी एमडीचा दावा, सेलेब्सलाही बनावट हिरे विकत होता चौकसी, असा करायचा फ्रॉड

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई/नवी दिल्ली - गीतांजली जेम्सचे माजी अध्यक्ष आणि एमडी संतोष श्रीवास्तव यांनी मेहुल चौकसी यांच्या फसवणुकीबद्दल सोमवारी मोठा खुलासा केला. त्यांचा दावा आहे की चौकसीने फक्त पंजाब नॅशनल बँकेसोबत घोटाळा केला नाही, तर त्याने ग्राहकांनाही गंडा घातला आहे. एवढेच नाही तर त्याच्या ब्रँडसाठी काम करणाऱ्या सेलिब्रिटीजलाही त्याने ठगवलेले आहे. श्रीवास्तव यांचा आरोप आहे की संगीतकार हिमेश रेशमियालाही या व्यक्तीने गंडा घातलेला आहे. हिमेशकडून एक जाहिरात करुन घेतली होती, त्याच्या बदल्यात कमी किंमतीचे हिरे त्याला दिले. एवढेच नाही तर चौकसी हा 10 पट अधिक किंमतीने हिरे विक्री करतो. नीरव मोदी आणि मेहुल चौकसी यांनी पंजाब नॅशनल बँकेचे बनावट लेटर ऑफ अंडरटेकिंग देऊन 11,356 कोटी रुपयांचा घोटाळा केल्याचा आरोप आहे. सध्ये हे दोघेही भारत सोडून फरार झाले आहेत. 

 

- संतोष श्रीवास्तव यांनी दावा केला आहे, की त्यांच्यासमोर अनेक वेळा ग्राहकांना बनावट हिरे किंवा कमी दर्जाच्या कमी किंमतीचे हिरे विकण्यात आले. उदाहरणार्थ एका ग्राहकाला एक हिरा 50 लाखांना देण्यात आला होता. वास्तविक गीतांजलीसाठी त्याची किंमत 2000 ते 3000 रुपये होती. ते खऱ्या आणि बनावट हिऱ्यांची सरमिसळ करुन असे करत होते. रिपब्लिकन टीव्हीला दिलेल्या मुलाखतीत श्रीवास्तव यांनी हा दावा केला. 
- श्रीवास्तव म्हणाले, किंमती निश्चित करण्यात माझा थेट संबंध नव्हता. मात्र ते माझ्या लक्षात येत होते. मी अनेकदा मेहुल चौकसीच्या हे निदर्शनास आणून दिले होते. मात्र त्यांनी मला चूप केले. तुझा याच्याशी काही संबंध नाहीत तु तुझ्या कामाशी संबंध ठेव. 
- संतोषने सांगितले, 'गीतांजली ग्रुपमध्ये 2009 ते 2013 पर्यंत काम करत होतो. या दरम्यान अनेक संशयीत व्यवहार माझ्या लक्षात आला.'

 

हिमेश रेशमियाला कसा घातला गंडा? 
- त्यांनी सांगितले, 'हिमेश रेशमियाला टीव्ही जाहिरात करण्याच्या बदल्यात 50 लाख रुपयांचे हिरे देण्याचे अश्वासन दिले होते. रेशमियाने जेव्हा गीतांजलीचे हिरे बाहेर बाजारात तपासून पाहिले तेव्हा त्याची किंमत फारच कमी होती. असे फक्त रेशमिया या सेलिब्रिटीसोबतच केले होते असे नाही तर अनेकांना असा गंडा घातला गेला होता.'

बातम्या आणखी आहेत...