आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Live टीव्ही शो मध्ये भडकला मौलाना; महिलेला केली मारहाण, स्टुडिओतूनच अटक

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - तीन तलाकच्या मुद्द्यावर एका खासगी वृत्तवाहिनीवर सुरू असलेल्या चर्चासत्रात मंगळवारी मारामारी झाली. चर्चा सुरू असताना मौलाना एजाज अरशदी कासमी भडकला आणि लाइव्ह शोमध्ये महिला वकील आणि त्याच्या जोरदार हाणामारी झाली. त्या महिला वकिलाचे नाव फराह फैज असून त्या बरेलीच्या निदा खान विरोधात मुस्लिम धर्मगुरुंनी काढलेल्या फतव्याचा विरोध करत होत्या. हाणामारीची माहिती मिळताच पोलिस त्या टीव्ही चॅनलच्या कार्यालयात धडकले आणि मौलाना कासमीला ताब्यात घेतले.


मौलाना कासमी ऑल ​इंडिया मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डाचे सदस्य आहेत. तर फराह फैज तीन तलाक मुद्यावर मुख्य याचिकाकर्ता आहे. सोबतच या कार्यक्रमात सामाजिक कार्यकर्ते अंबर झैदी सुद्धा उपस्थित होते. तीन तलाक, हलाला आणि पीडितेच्या विरोधात मौलवींनी काढलेला फतवा यावर चर्चा सुरू होती. या चर्चेत परस्पर विरोधी पक्षांमध्ये वाद इतका वाढला की मौलाना कासमी आणि वकील फराह आपल्या जागेवरून उठले. दोघांनी एकमेकांना वाइट म्हटले. त्याचवेळी फराहने एक चापट कासमीच्या गालावर लावली. त्यावर आधीच भडकलेल्या कासमीने महिलेचे केस धरून तिला मारहाण केली. सोशल मीडियावर या घटनेचे फोटो आणि व्हिडिओ शेअर केले जात आहेत. तसेच विविध प्रकारच्या प्रतिक्रिया समोर येत आहेत. काहींनी मौलानांनी अशा कार्यक्रमांमध्ये भाग घेऊच नये असे सल्ले दिले. तर काहींनी असेच धर्मगुरू धर्माला बदनाम करतात अशी प्रतिक्रिया दिली.

बातम्या आणखी आहेत...