आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पोलिस बंद करणार Burari प्रकरणाची फाइल, फाशीमुळेच झाला होता 11 जणांचा मृत्यू

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - बुराडी येथील भाटिया कुटुंबातील 11 जणांच्या मृत्यू प्रकरणाची फाईल लवकरच बंद केली जाण्याची शक्यता आहे. या सर्वांचा मृत्यू फाशीवर लटकल्यामुळेच झाला असल्याचे स्पष्ट होत आहे. नारायण देवी यांच्या पोस्ट मॉर्टर्म रिपोर्टनंतर सर्वांचा मृत्यू अशाचप्रकारे झाल्याचे स्पष्ट झाले आहेत. पोस्ट मॉर्टम रिपोर्टमध्ये काहीही गडबड आढळली नसल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. 

 

या प्रकरणी डॉक्टरांनी पोलिसांना अंतिम अहवालही सादर केला आहेत. त्यात या प्रकरणात शंका घेण्यासारखे काहीही नसल्याचे समोर येत आहे. म्हणजेच सर्वांचा मृत्यू फाशी घेतल्यानेच झाला. घरातून मिळालेल्या पुराव्यांमुळे सर्वांनी ललितच्या शब्दांवर विश्वास ठेवून धार्मिक कारणाने ही आत्महत्या केल्याचे स्पष्ट होत आहे. त्यामुळे पोलिसांनी जवळपास हे प्रकरणच बंदच केले आहे. फक्त पोलिस सध्या या प्रकरणी विसेरा रिपोर्ट येण्याची वाट पाहत आहेत.  


यांचा झाला होता मृत्यू 
बुराडी येथील भाटिया कुटुंबातील 11 जणांचा मृतदेह घरात आढळले होते. त्यापैकी 10 फासावर लटकलेले तर एका महिलेचा मृतदेह खोलीत आढळला होता. त्यानंतर घरात सापलडलेल्या विविध गोष्टींवरून अनेक अंदाज लावण्यात आले होते. त्यानंतर अखेर वडिलांच्या आत्म्याला मुक्ती मिळाली म्हणून पुजा करताना हा प्रकार केल्याचे स्पष्ट झाले. या घटनेत

नारायण देवी (77) त्यांची मुलगी प्रतिभा (57) दोन मुले भवनेश (50) आणि ललित (45), भवनेशची पत्नी सविता (48) त्यांची तीन मुले नीतू (25), मानिका (23) आणि धीरेन्द्र (15), ललितची पत्नी टीना (42), त्यांचा मुलगा दुष्यंत (15), प्रतिभाची मुलगी प्रियंका यांचा मृतांमध्ये समावेश होता. प्रियांकाचा गेल्या महिन्यात साखरपुडा झाला होता आणि तिचे लवकरच लग्न होणार होते. 

बातम्या आणखी आहेत...