आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • President Appointed Four Members To Rajya Sabha Including Ram Shakal An Sonal Mansingh

राष्ट्रपतींकडून चौघांची राज्यसभेवर नियुक्ती, राकेश सिन्ह, सोनल मानसिंह यांचा समावेश

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - सचिन, रेखा यांच्यासह चार जणांच्या रिक्त झालेल्या राज्य सभेच्या जागेवर राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी आज नवीन सदस्यांची नियुक्ती केली आहे. यामध्ये शेतकरी नेते राम शकल, लेखक आणि स्तंभलेखक राकेश सिन्हा, शिल्पकार रघुनाथ महापात्रा आणि शास्त्रीय नृत्यांगणा सोनल मानसिंह यांचा समावेश आहेत.  

 

1. राम शकल - सामाजिक कार्य (उत्तर प्रदेश)
- शिक्षण MA 
- दलित समुदायासाठी महत्त्वाचे योगदान. शेतकरी, श्रमिक यांच्यासाठी झटणारे म्हणून प्रसिद्ध. 
- तालुका, जिल्हा आणि राज्य स्तरावर चार वर्षांपासून काम करत आहेत. 
- रॉबर्ट्सगंज (युपी) मधून तीनवेळा खासदार बनले आहेत. 


2. राकेश सिन्हा, साहित्य (बिहार)
- शिक्षण - पीएचडी 
- प्रसिद्ध लेखक आणि दिल्लीतील एखा महाविद्यालयाचे प्राध्यापक आहेत. 
- हिंदी सल्लागार समिती आणि फिल्म सर्टिफिकेशन अपिलेट ट्रिब्युनलचे सदस्यही राहिलेले आहेत. 
- अनेक वृत्तपत्रांमध्ये ते नियमित लेख लिहितात आणि टिव्ही चॅनरवर भाजप तसेच संघाची बाजू मांडतात. 
- यांनी अनेक पुस्तकांचे लिखाण केले आहेत, त्यात डॉ. हेडगेवार यांच्या चरित्राचाही समावेश आहे. 


3. रघुनाथ महापात्रा, कला (ओडिशा)
- दगडांना आकार देण्याच्या कलेमुळे यांना आंतरराष्ट्रीय स्तरावर शिल्पगुरू म्हणून ओळखले जाते. 
- प्राचीन मूर्ती आणि स्मारकांच्या संवर्धनाच्या क्षेत्रात यांनी मोलाचे कार्य केले आहे. 
- पुरी येथील जगन्नाथ मंदिराच्या सौंदर्यातही यांची महत्त्वाची भूमिका आहे. 
- ओडिशा ललित कला अकादमीचे ते विद्यमान अध्यक्ष आहेत. 
- त्यांना पद्म विभूषण (2013), पद्म भूषण (2001), पद्म श्री (1975) मिळालेला आहे. 
- 22 वर्षे वय असताना त्यांना 1964 मध्ये शिल्पकलेच्या क्षेत्रात राष्ट्रीय पुरस्कार मिळाला होता. 

बातम्या आणखी आहेत...