आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लोकांना नपुंसक बनवणारा किन्‍नर अटकेत, कापायचा प्रायव्‍हेट पार्ट

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

दिल्‍ली -   दिल्‍ली क्राइम ब्रँचने फुटपाथवर काम करणा-या लोकांना आपले सावज बनवणा-या एका किन्‍नरला अटक केली आहे. हा किन्‍नर लोकांना आपल्‍या जाळ्यात ओढायचा व नंतर त्‍यांना निर्जन स्‍थळी घेऊन जाऊन त्‍यांचे प्रायव्‍हेट पार्ट कापायचा. 


यामुळे कापायचा प्रायव्‍हेट पार्ट 
दिल्‍लीच्‍या जहांगीरपुरी परिसरात राहणा-या या किन्‍नरचे नाव बिजली बाई असल्‍याचे सांगितले जात आहे. किन्‍नरांची संख्‍या वाढवण्‍यासाठी हा किन्‍नर लोकांना नपुंसक बनवायचा अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. खजूरी खास परिसरात राहणा-या एका युवकाने यासंदर्भात तक्रार दिली होती. तेव्‍हापासून पोलिस या किन्‍नरच्‍या मागावर होते. 


कसाबसा जीव वाचवून पळाला युवक
तक्रारीनूसार या युवकालाही किन्‍नराने आपले शिकार बनवले होते. युवकाशी ओळख वाढवून किन्‍नराने त्‍याला आपल्‍यासोबत नेले व संधी मिळताच त्‍याचे प्रायव्‍हेट पार्ट कापले. त्‍यानंतर हा युवक कसाबसा आपला जीव वाचवून तेथून निसटण्‍यात यशस्‍वी झाला होता. नंतर याची तक्रार युवकाने दिल्‍ली पोलिसांकडे केली होती. 

 

इतर किन्‍नरांचाही तपास सूरू 
याविषयी क्राइम ब्रँचचे डिसीपी राजेश देव यांनी सांगितले की, 'किन्‍नराची चौकशी सूरू आहे. आम्‍हाला शंका आहे की, आतापर्यंत या किन्‍नराने अनेकांना अशा पद्धतीने नपुंसक बनवले असावे.' तपासादरम्‍यान या किन्‍नरावर 3 गुन्‍हे दाखल असल्‍याची माहिती पोलिसांना मिळाली आहे. याप्रकरणी पोलिस बिजली बाईसह इतर किन्‍नरांचाही तपास करत आहे. 

 

बातम्या आणखी आहेत...