आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विद्यापीठामध्ये प्राध्यापकपदी नियुक्तीस पीएचडी अावश्यक - प्रकाश जावडेकर

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - उच्च शिक्षणाचा दर्जा वाढवण्यासाठी केंद्र सरकारने प्राध्यापकांची नियुक्ती व पदाेन्नतीसंबंधी नियमांत बुधवारी बदल केले. काॅलेजच्या प्राध्यापकांसाठी असलेली एपीअाय प्रणाली संपुष्टात अाणली. २०२१- २२ पासून विद्यापीठातील प्राध्यापकांच्या नियुक्तीसाठी संबंधित उमेदवाराने पीएचडी पूर्ण करणे सक्तीचे करण्यात अाले अाहे. यापूर्वी  ‘नेट’ परीक्षा उत्तीर्ण असणाऱ्यांनाही ही नियुक्ती मिळत हाेती.

 

केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री प्रकाश जावडेकर म्हणाले, ‘अाता २०२२ पासून विद्यापीठात फक्त पीएचडी धारकांनाच नियुक्ती मिळेल.  प्राध्यापकांनी फक्त चांगल्या शिक्षणावर भर देण्याच्या उद्देशाने ‘एपीअाय’ प्रणाली बरखास्त करण्यात येत असल्याचेही ते म्हणाले.

 

बातम्या आणखी आहेत...