आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

केंद्रासह राज्यांतील एससी-एसटी कर्मचाऱ्यांना पदोन्नतीत आरक्षण: रामविलास पासवान

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - अनु. जाती-जमातीच्या कर्मचाऱ्यांना पदोन्नतीत आरक्षण देण्यासाठी केंद्र सरकारला सर्वाेच्च न्यायालयाकडून मिळालेली मंजुरी राज्य सरकारच्या कर्मचाऱ्यांनाही लागू असेल. केंद्रीय मंत्री रामविलास पासवान यांनी उच्चस्तरीय मंत्रिसमूहाच्या बैठकीनंतर ही माहिती दिली. 


पासवान म्हणाले, ‘सुप्रीम कोर्टाचे निर्देश राज्यांना लागू होतील का, याबाबत आधी संशय होता. मात्र आता तो दूर झाला आहे. कार्मिक आणि प्रशिक्षण विभाग लवकरच याबाबत आदेश जारी करेल.’ विविध हायकोर्टांच्या आदेशांमुळे एससी-एसटी वर्गासाठी पदोन्नतीवर स्थगिती आली होती. या मुद्द्यावर केंद्राने हायकोर्टात दाद मागितली होती. 

 

अॅट्रॉसिटी कायद्यावर अध्यादेशही तयार
पासवान म्हणाले, अॅट्रॉसिटी कायदा जुन्या रूपात बहाल करण्यासाठी सरकारने अध्यादेश तयार केला आहे. तथापि, आधी सरकार सुप्रीम कोर्टात दाखल फेरविचार याचिकेच्या निकालाची प्रतीक्षा करेल. त्यानंतर निर्णय घेतला जाईल.

 

बातम्या आणखी आहेत...