आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Pune Police Get Email Of Planing Pm Modi Assassination माओवाद्यांच्या निशाण्यावर मोदी

माओवाद्यांच्या निशाण्यावर PM- \'मोदी राज संपवण्यासाठी राजीव गांधी हत्याकांडासारखे काही करु\'

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुणे पोलिसांनी अटक केलेल्या नक्षलींकडे मोदींची हत्या करण्याचे षडयंत्र रचल्याचा मेल सापडला. - Divya Marathi
पुणे पोलिसांनी अटक केलेल्या नक्षलींकडे मोदींची हत्या करण्याचे षडयंत्र रचल्याचा मेल सापडला.

पुणे/नवी दिल्ली - काेरेगाव भीमा प्रकरणात अटक केलेल्या पाच अाराेपींना गुरुवारी न्यायालयासमाेर हजर करून सरकारी पक्षाने त्यांचे नक्षलवाद्यांशी संबंध असल्याचा युक्तिवाद केला. इतकेच नव्हे तर ‘राजीव गांधी यांच्या हत्येप्रमाणे देशात पुन्हा अात्मघातकी हल्ला करण्याच्या दृष्टीने नक्षलवादी नेते विचार करत अाहेत. तसेच माेठा शस्त्रसाठ्याचा पुरवठा करण्यात अाला अाहे,’ असा उल्लेख असलेले नक्षलवादी चळवळीतील बड्या नेत्याचे पत्र या अाराेपींकडील दस्तएेवजात पाेलिसांना सापडल्याचा गाैप्यस्फाेट सरकारी वकिलांनी गुरवारी पुण्याच्या न्यायालयात केला. सरकारी वकील उज्ज्वला पवार यांनी कोणाचेही नाव घेतले नसले तरी हा कट पंतप्रधान नरेंद्र मोदींसाठी रचला जाणार होता का, असा प्रश्न निर्माण झाला आहे. पुण्यात झालेल्या एल्गार परिषदेला नक्षलवाद्यांचे पाठबळ असल्याचा आरोपावरुन 6 जून रोजी पाच जणांना अटक करण्यात आली. त्यातील रोना विल्सन याच्या लॅपटॉपमध्ये हे पत्र सापडल्याचा दावा सरकारी वकीलांनी केला आहे. 

 

न्यूज एजन्सींच्या वृत्तात म्हटले, आहे की पोलिसांनी माओवाद्यांचे इंटरनल कम्युनिकेशन इंटरसेप्ट केले आहे. त्यामध्ये म्हटले आहे, की नरेंद्र मोदींनी 15 राज्यात सरकार स्थापन केले आहे. असेच चालत राहिले तर माओवाद्यांना मोठो धोका निर्माण होण्याची शक्यता आहे. कॉम्रेड मोदी राज संपवण्यासाठी काही ठोस करावे लागले. यासाठी आम्ही राजीव गांधींसोबत जे झाले होते तशा घटनेचा विचार करत आहोत. शक्यता आहे की आम्ही यशस्वी होऊ, हीच योग्य वेळ आहे. त्यांच्या रोड शोला लक्ष्य करणे योग्य राहील. 

 

- सरकारी वकिलांनी गुरुवारी कोर्टात माहिती देताना नरेंद्र मोदींचे नाव घेतले नव्हते, मात्र जो मेल कोर्टात सादर केला होता त्यात 'राजीव गांधी सारखे हत्याकांड' असे म्हटले होते. पोलिसांनी कोर्टात 5 पत्र सादर केले आहेत. यातील एक रोना विल्सनच्या लॅपटॉपमधून मिळाले असल्याचा दावा केला आहे. 

 

पुढील स्लाइडवर वाचा, अटक केलेले कोण आहेत...

 

बातम्या आणखी आहेत...