आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Punjab National Bank Fraud Case: ED Raids 10 Properties Of Diamond Trader Nirav Modi

देशातील सर्वात मोठा 11,356 कोटींचा बँकिंग घोटाळा;व्यावसायिक नीरव मोदीच्या 17 ठिकाणांवर छापे

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली/मुंबई- व्यावसायिक नीरव मोदी याच्याविरुद्ध कारवाई करत ईडीने गुरुवारी ५१०० कोटी रुपयांचे हिरे, दागिने आणि सोने जप्त केले. मुंबईत ६ मालमत्ताही सील केल्या. मुंबई, दिल्ली, हैदराबाद, जयपूर आणि सुरतमध्ये नीरवशी संबंधित १७ ठिकाणांवर छापे टाकण्यात आले. सीबीआयनेही २० ठिकाणे छापे टाकले. नीरवच्या कंपन्यांना भारतीय बँकांच्या हाँगकाँग शाखांतून पैसे दिले गेले. त्यामुळे तेथेही तक्रार दाखल करण्यात आली.


किमान ३० बँकांनी पीएनबीच्या एलओयूवर (लेटर ऑफ अंडरटेकिंग) नीरवच्या कंपन्यांना कर्ज दिले. पीएनबीने सीबीआयला १५० बनावट एलओयूच्या प्रती दिल्या आहेत. दरम्यान, काँग्रेसने नीरवचे दावोसमधील पंतप्रधानांसोबतचे छायाचित्र जाहीर करून त्याला छोटा मोदी संबोधले. यावर भाजपचे रविशंकर प्रसाद म्हणाले, असे काँग्रेस नेत्यांचेेही फोटो आहेत. 


इकडे लूकआऊट नोटीस जारी... अन् जानेवारीच्या सुरुवातीलाच नीरव मोदीने भारत सोडला होता

नीरव मोदी, त्याची पत्नी एमी, भाऊ विशाल आणि व्यवसायातील भागीदार व मामा मेहुल चौकसी यांच्याविरुद्ध ३१ जानेवारीला सीबीआयने गुन्हा दाखल केला. ही तक्रार २९ जानेवारीला आली होती. मात्र, नीरव भावासोबत १ जानेवारीलाच भारताबाहेर पळाला होता. भाऊ विशालकडे बेल्जियम तर पत्नी एमीकडे अमेरिकेचे नागरिकत्व आहे. एमी आणि गीतांजली जेम्सचा प्रमोटर मेहुल ६ जानेवारीला भारतातून पळाले. सीबीआयने या चौघांविरुद्ध ४ फेब्रुवारीला लूकआऊट नोटीस बजावली.


पूर्वी पापड विकत होते कुटुंब
नीरव गुजरातमधील पालनपूरचा आहे. वडील पीयूष कुटुंबासह बेल्जियममध्ये स्थायिक. पालनपूरमध्ये नीरवचे आजोबा किरायाने राहतात आणि आजी पापड विकत होती.


इतर बँक अधिकाऱ्यांवरही संशय : पीएनबी
पीएनबीने ३० बँकांना पत्र पाठवले आहे. यात म्हटले आहे की, एलओयूमध्ये पीएनबीने आयातीनंतर एक वर्षात कर्ज फेडावे लागेल, असे नमूद केले होते. याकडे दुर्लक्ष झाले. कदाचित इतर बँकांचे अधिकारी पण या घोटाळ्यात सहभागी असू शकतात.
- इतर बँकांचे म्हणणे आहे की, पीएनबी ही रक्कम परत देण्यात विलंब करेल, अशी बँकांना शंका आहे. त्यामुळे अर्थ मंत्रालयाने हस्तक्षेप करावा.


काँग्रेसचे ४ प्रश्न
- नीरव मोदीने बनावट एलओयूच्या माध्यमातून बँकिंग प्रणालीशी खेळ केला. याला जबाबदार कोण?
- २६ जुलै २०१६ रोजी तक्रार केल्यावर पीएमनी कारवाई का नाही केली? वित्त मंत्रालय, आर्थिक गुप्तचर विभाग, इतर विभाग काय करत होते?
- २९ जानेवारी २०१८ रोजी पीएनबीने सीबीआयला पत्र लिहून नीरव मोदीविरुद्ध लूकआऊट नोटीस काढण्याचा आग्रह केला होता. तरीही नीरव पळण्यात यशस्वी कसा झाला? 
- सर्व ऑडिटर्स आणि तपास करणारे यांच्या नजरेतून घोटाळा कसा सुटला?


भाजपचे उत्तर
घोटाळा तर यूपीएच्या काळात झाला. त्यांनी दबाव वाढवला होता. आमचे सरकार तर घोटाळा उघड करत आहे. 
-निर्मला सीतारमण


ईडीने कुठे टाकले छापे?
- ईडीने नीरव मोदीच्या 10 ठिकाण्यांवर छापे टाकले आहेत. 
- मुंबईतील कुर्ला येथील घर, काळाघोडा येथील ज्वेलरी शोरुम, वांद्रे येथील 3 ठिकाणी ईडीने छापेमारी केली आहे. 
- सूरतमध्ये तीन ठिकाणी कारवाई करण्यात आली. 
- दिल्ली येथे चाणक्यपूरी आणि डिफेन्स कॉलनी येथील शोरुमवर ईडीने छापा टाकला आहे.


नीरवसह कोणावर केस?
- 280 कोटींच्या फसवणूक प्रकरणी ईडीने नीरव मोदीसह त्याची पत्नी एमी, भाऊ निशाल, चीनूभाई चौकसी, डायमंड कंपनीतील सर्व पार्टनर, सोलर एक्सपर्ट्स, स्टेलर डायमंड आणि बँकेचे दोन अधिकारी गोकुळनाथ शेट्टी (आता निवृत्त आहे) आणि मनोज खरत यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

 

 हेही वाचा,
पीएनबी भारतीयांच्या पैशातून कामाला सुरुवात करणारी देशातील पहिली बँक; लालाजींचा पुढाकार

'PM मोदींची गळाभेट घ्या, 12 हजार Cr. घेऊन जा', PNB घोटाळ्यावर राहुल गांधींची बोचरी टीका

तपासामध्ये आमच्यावर जबाबदारी निश्चित झाली तर नक्कीच पैसे परत करू : पीएनबी


पुढील स्‍लाइडवर पाहा, कोणावर अन् काय परिणाम?

बातम्या आणखी आहेत...