आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वायुदलाच्या गरजेकडे दुर्लक्ष करून राफेल सौदा- काँग्रेस; एक इंजिनाच्या विमानांची खरेदी

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली- केंद्रातील भाजप सरकारने राफेल युद्ध विमानांचा करार करताना वायुदलाच्या गरजांना ध्यानात घेतले नाही. राष्ट्रीय संरक्षणासारख्या गंभीर मुद्द्याविषयी सत्ताधारी गंभीर नसल्याचा आरोप विरोधी पक्ष काँग्रेसने केला आहे. काँग्रेसचे जनसंपर्क विभागप्रमुख रणदीपसिंह सुरजेवाला यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना यासंबंधी ट्विटरच्या माध्यमातून प्रश्न केला आहे. 


वायुदलाने दोन इंजिन असलेल्या युद्ध विमानांची गरज असल्याचे म्हटले होते. असे असताना एक इंजिन असलेली विमाने खरेदी का केली जात आहेत, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. संयुक्त पुरोगामी आघाडीच्या सरकारने २००७-१२ दरम्यान दोन इंजिन असलेल्या राफेल विमानांची चाचणी घेतली होती. त्याच्या खरेदीसंबंधी पडताळणी प्रक्रियाही केली होती. त्या आधारे २ इंजिने असलेली १२६ विमाने खरेदी करण्याची निविदा काढली होती. मोदी सरकारने मे २०१५ मध्ये ही निविदा रद्द ठरवली.  


मोदी सरकारला जर राफेल विमानेच खरेदी करायची होती तर त्यांनी १२ डिसेंबर २०१२ रोजी १२६ विमाने खरेदीसंबंधीची निविदा का रद्द केली, असा प्रश्न सुरजेवाला यांनी विचारला आहे.  

विमान क्षेत्रात ऑटो पायलट तंत्राला प्रोत्साहन देणार : प्रभू  

केंद्रीय वाणिज्य व उद्योगमंत्री सुरेश प्रभू यांनी नागरी उड्डयन मंत्रिपदाचा कार्यभार स्वीकारल्यानंतर ऑटो पायलट विमानांची (स्वयंचलित) गरज असल्याचे म्हटले आहे. भारताचे विमान क्षेत्र अधिक विस्तारण्यासाठी नजीकच्या भविष्यात अशा विमानांची खरेदी आवश्यक असेल. वाहतुकीच्या इतर साधनांशी विमान क्षेत्र स्पर्धा करत आहे. येथे अनेक संधी आहेत. १००० पेक्षा अधिक विमाने खरेदी करण्याची गरज आहे. यामुळे सामान्य माणसाचा व उद्योगांचा फायदा होईल. नागरी उड्डयन मंत्रालय याबाबतीत उद्योग, वाणिज्य मंत्रालयाशी ताळमेळ साधेल, असे सुरेश प्रभू म्हणाले.

 

बातम्या आणखी आहेत...